Breaking News

*श्री चिंधुजी गौरखेडे यांचे अपघाती निधन*

*श्री चिंधुजी गौरखेडे यांचे अपघाती निधन*

कन्हान : – खंडाळा (निलज) येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. चिंधुजी देवराव गौरखेडे यांचे बुधवार दिनांक.१५ डिसेंबर ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अपघाती निधन झाले.
शनिवार दिनांक.११ डिसेंबर ला श्री. चिंधुजी देवराव गौरखेडे वय ७० वर्ष राहणार खंडाळा हे शेतातील मेथीची भाजी कन्हान बाजारात विकुन सायंकाळी आपल्या गावी खंडाळा येथे सायकल घेऊन पायी जात असता तारसा रोड वर घारड यांच्या घराजवळ एका दुचाकीने धडक मारली. त्यात चिंधुजी गौरखेडे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा मेयो इस्पितळात उपचारा दरम्यान बुधवार दिनांक.१५ डिसेंबर ला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अपघाती निधन झाले. गुरूवार दिनांक.१६ डिसेंबर ला दुपारी एक वाजता स्मश्यान घाट खंडाळा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …