Breaking News

*कोळसा चोरून ट्रक मध्ये भरून पळालेल्या आरोपी व ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल* *अवैद्य कोळसा चोरीवर अंकुश कोण लावणार ?*

*कोळसा चोरून ट्रक मध्ये भरून पळालेल्या आरोपी व ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल*

*अवैद्य कोळसा चोरीवर अंकुश कोण लावणार ?*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि इंदर खुली कोळसा खदान चा कोळसा चोरून अवैद्यरित्या ट्रक मध्ये भरून पसार झालेल्या दोन आरोपी विरूध्द वेकोली सुरक्षा अधिकारी यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपी चा शोध घेत आहे.


कन्हान शहराला लागुन जवळजवळ वेकोलि च्या कामठी, इंदर व गोंडेगाव अश्या तीन खुली कोळसा खदान असुन कोळसा चोरीचा गौरख धंदा ट्रक व दुचाकी वाहनाचा वापर करून जोमाने सुरू असुन बिनधास्त दुचाकी वाहनावर तीन चार बोऱ्या कोळसा लादुन कामठी व नयाकुंड कडे पहाटे सकाळ पासुन दिवस भर सुरू असुन सुध्दा वेकोलि अधिकारी व कन्हान पोलीस अधिकारी आणि पोलीस मुकदर्शकाची भुमिकेत असल्याची नागरिकात चर्चेला ऊत येत आहे. मंगळवार दिनांक.१४ डिसेंबर ला रात्री १० ते १०.३० वाजता दरम्यान वेकोलि इंदर खुली कोळसा खदान मधिल कोळसा भुजंग महल्ले व ट्रक क्रमांक एम पी २० २०९० चा चालक यानी संगणमत करून इंदर कोळसा खदान चा कोळसा चोरून अवैद्यरित्या ट्रक क्रमांक एम पी २० २०९० मध्ये ८ टन कोळसा भरून ट्रक घेऊन पळाल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी संतोष यादव यानी कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी १) भुजंग महल्ले राहणार. टेकाडी व २) ट्रक क्रमांक एम पी २० २०९० चा चालक यांचे विरूध्द कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात पोलीस कॉस्टेबल मंगेश ढबाले पुढील तपास करित दोन्ही आरोपी व ट्रक चा शोध घेत आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …