*स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पथकाने बनावटी मॉऊझर आरोपी च्या घरून जप्त केली*
*आरोपी जवळुन बनावटी मॉऊझर किंमत ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवित शिवाजी नगर कन्हान येथील शाहरुख खान व त्यांच्या घराची झडती घेत एक देशी बनावटीची माऊझर किंमत ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले.
पोलीस सुत्राकडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक.१४ डिसेंबर ला पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण मा.श्री विजयकुमार मगर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हेशाखा नागपुर ग्रामिण पथकाने कन्हान उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवित असतांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, शिवाजी नगर कन्हान येथील शाहरुख खान नावाचा इसम आपले ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी माऊझर बाळगुन आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यावरून त्याची व त्याच्या घराची झडती घेतली असता घर झडती मध्ये एक देशी बनावटीची माऊझर किंमत ४० हजार रूपयाची मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम ३, २५ भा ह का अन्वये कारवाई करून कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करित पुढील कारवाई करण्याकरिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले. सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे अन्वेशन नागपुर ग्रामिण सपोनि अनिल राऊत, पोहवा. विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, अरविंद भगत, पोलीस नाईक शैलेश यादव, पोशि. वीरेंद्र नरड, चालक सफौ साहेबराव बहाळे आदीनी यशस्विरित्या पार पाडली.
Maharashtra News Media सच की आवाज