Breaking News

*सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव इंडिया 75 अंतर्गत शाळा स्तरीय केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन*

*सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव इंडिया 75 अंतर्गत शाळा स्तरीय केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात ‘आजादी का अमृतमहोत्सव इंडिया 75 ‘ शाळा स्तरीय प्रश्नमंजुषा गुमथळा केंद्राअंतर्गत घेण्यात आली. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून केंद्रप्रमुख गमे सर, संस्थेच्या संचालिका सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ लता वाघ अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. केंद्रातर्गत शाळा स्तरीय प्रश्नमंजुषा करिता परीक्षक म्हणून मनीषा उईके जिल्हा परिषद शाळा भरतवाडा, राजेशजी वैरागडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुमथळा, उमाकांतजी अंजनकर उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरु करण्यापूर्वी उद्घाटक म्हणून केंद्रप्रमुख गमे सर यांनी आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली व प्रश्नमंजुषा करिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये पहिल्या प्राथमिक गटात पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बैलवाडा अनुष्का भीमराव ढोके, सरस्वती विद्यालय बोखाराची धनश्री अमर केनेकर ,सरस्वती भवन कॉन्व्हेंट बोखारा ची नयन सुधाकर गेडाम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरतवाडा सार्थक रमेश पालेकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोधनी रेल्वे उमेश संजय मेहरे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा कु.इजल संजय उमाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिटेसुर कु. अंकिता दिगंबर कोसे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुमथळा कु. महिमा दुर्गाप्रसाद कुशवाहा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोखारा हिमांशी दिनेश रामटेके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणारा चारुण्य राज कांबळे यांनी सहभाग घेतला होता . प्राथमिक गटातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बैलवाडा ची कुमारी अनुष्का भीमराव ढोके हीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच माध्यमिक गटांमध्ये सरस्वती विद्यालय कोराडी रोड बोखारा कु. नेहारिका अविनाश आडे,सरस्वती भवन कॉन्व्हेंट हायस्कूल बोखारा चेतन राधेशाम बारंगे, श्रीकृष्ण विद्यालय गोधनी रेल्वे कुमारी गायत्री केवळराम बावनकर यांनी सहभाग घेतला .यामध्ये सरस्वती भवन कॉन्व्हेंट बोखाराचा विद्यार्थी चेतन राधेशाम बारंगे याने प्रथम क्रमांक पटकावला . प्राथमिक व माध्यमिक गटातील विजेते विद्यार्थी जिल्हास्तरावरील प्रश्नमंजुषा करिता पात्र ठरलेले आहेत असे परीक्षकांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ लता वाघ यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर जे विद्यार्थी जिंकून आले नाहीत त्यांना कसे जिंकता येईल याविषयी उद्बोधन केले. तसेच आजादी का अमृत महोत्सव इंडिया 75 वर्षभरातील कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना क्रांतिकारक समाजसुधारक यांची विशेष करून ओळख होईल व भारतीय स्वातंत्र्य आपल्याला किती संघर्षाने मिळाले किंवा भारतीय स्वातंत्र्य कसे टिकवून ठेवायचे आहे याबद्दलही आपण कसे जागरूक राहायला पाहिजे याविषयी सांगितले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुवर्णा जांभुळकर व प्रा. दीक्षा जनबादे यांनी केले तर आभार प्रा सुनीता नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा.रश्मी जवंजाळ प्रा. आनंद ठाकरे, शिक्षिका किशोरी भड , क्रीडाशिक्षक विद्या गजभिये तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …