Breaking News

*वीज निर्मिती केंद्रातील कामगारांचा मेळावा संपन्न*

*वीज निर्मिती केंद्रातील कामगारांचा मेळावा संपन्न*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा:- नागपूर जिल्ह्यातील व औष्णिक विज निर्मिती केंद्र खापरखेडा व कोराडीच्या वीज कंत्राटी कामगारांचा आज शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर रोजी कामगार मेळावा सदभावना मनोरंजन केंद्र प्रकाश नगर क्लब नंबर 2 खापरखेडा येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न भारतीय मजदूर संघ) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री निलेशजी खरात, सरचिटणीस श्री सचिनजी मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेशजी आनेराव, संघटन मंत्री राहुलजी बोडके व कोषाध्यक्ष सागरजी पवार कोराडीचे प्रकल्पातील अध्यक्ष राहुल नागदेवे, उपाध्यक्ष
प्रतीक रंगारी, उपाध्यक्ष विश्वनाथ चव्हाण,प्रशांत अडकने,सागर प्रधान,अजीत गेडाम,पराग पाटील,राजेश हरीहर,किशोर सोनटक्के,नितीन मनवर तर खापरखेडा प्रकल्पाचे सचिव विनोद बन्सोड, उपाध्यक्ष विजय आंबेकर,कार्याध्यक्ष विलास गुजरमाळे, कार्याध्यक्ष दिलीप येवले कार्याध्यक्ष पवन कोठारी विजय बागडे योगेश महल्ले विष्णु घारड उपस्थित होते

सर्व कामगारांची वेतन बँक खाती एच.डी.एफ.सी येथे काढणार असून अपघात झाल्यास कामगाराला 11 लाखाचा विमा मिळणार आहे या योजनेचा शुभारंभ खापरखेडा वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता मा.राजीव घुगे व बँक प्रतिनिधी शरद मिश्रा हे उपस्थित होते.
सर्व कामगारांच्या समस्या जाणून घेऊन या समस्या सोडविण्यासाठी महानिर्मिती, महावितरण व महापारेषण कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी एकत्र लढा दिला पाहिजे असे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले

खापरखेडा कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कामगारांचे वेतन सध्या खूपच उशिरा होत आहे वेतानासाठी फंड उपलब्ध नाही हे कारण अयोग्य असल्याचे मत अध्यक्ष निलेश खरात यांनी केले. ऊर्जामंत्री यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती अशोभनीय आहे. या बाबत महानिर्मिती मुख्यालयाकडे तक्रार करण्यात येणार असून परिस्थितीत बदल ना झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी कामगारांनी दाखवली पाहिजे असा निर्धार या मेळाव्यात कामगारांन

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …