*पाणी पुरवठा योजनेची कामे गतीने पूर्ण करा – मंत्री सुनिल केदार*
*पाणी टंचाई आढावा बैठक व महाआवास अभियानाचा शुभारंभ*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – तालुक्यातील ग्रामपंचायतींनी मांडलेल्या पाणी समस्येची तातडीने दखल घेऊन टंचाईची कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आपसी समन्वय साधावा असेही मंत्री महोदय म्हणाले*
*शनिवारी ता.18 डिसेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व महाआवास अभियानाचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी नामदार केदार बोलत होते.ते पुढे म्हणाले मागील काळात पंचायत समितीने महाआवास अभियान राबवून घरकुल बांधणीला गती दिली यापुढे सुद्धा अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा जागेअभावी किंवा अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे निर्देशही तहसीलदार प्रतापराव वाघमारे व गटविकास अधिकारी दीपक गरुड यांना दिलेत.*
*पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीचे व महाआवास अभियान शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दीपक गरुड यांनी केले यावेळी त्यांनी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची माहिती दिली.यानंतर तालुक्यातील बऱ्याच गावातील सरपंचांनी कुठे जागेअभावी येणाऱ्या घरकुलातील समस्या तर कुठे पाणीटंचाई व विद्युत समस्या उपस्थित केल्या असता समस्या निकाली काढण्यासाठी मंत्रीमहोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत व जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 71 गावांची मंजूर कामे व सादर करण्यात आले असुन अहवालाचा सविस्तर आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे,उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमिला जाखलेकर,कार्यकारी अभियंता संजीव हेमके,उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार प्रताप वाघमारे,गटविकास अधिकारी दीपक गरुड, पंचायत समिती सभापती उपसभापती,उपविभागीय अभियंता योगेश इंगळे,शाखा अभियंता दिनकर बिहारे,पंचायत राज विस्तार अधिकारी रामदास,अभियंता संकेत जयसिंगकार नरेश गाठीबांधे, पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे,गणेश काकडे, ममता केसरे,भावना चिखले,राहुल तिवारी,जिजा बागडे, जिल्हा परिषद सदस्य मुक्ता कोकड्डे,प्रकाश खापरे,नीलिमा उईके आदींसह अन्य पदाधिकारी,अधिकारी,सचिव, ग्रामसेवकांची उपस्थिती होती.
Maharashtra News Media सच की आवाज