Breaking News

*सिहोरा कन्हान नदी पुलावरून उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या* *फिर्यादी वडील यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*

*सिहोरा कन्हान नदी पुलावरून उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या*

*फिर्यादी वडील यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर शहर बॉयपास राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील सिहोरा कन्हान नदी पुलावरून प्रफुल मंगर या युवकाने आजाराला कंटाळुन उडी घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी वडील यांचा तक्रारी वरुन मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी चंद्रभान मंगर राहणार संताजी नगर कांद्री-कन्हान यांचा मुलगा मृतक प्रफुल चंद्रभान मंगर यास मागील आठ ते दहा वर्षा पासुन मिर्गीचा त्रास होता आणि मिग्रीच्या आजाराचा उपचार सुरू होता. मृतक प्रफुल मंगर याला मिर्गीचा झटका आल्यानंतर तो पागला सारखा असंबंध बळ बळ करत असुन मला कोणाचा त्रास होत असल्याने आत्महत्या करतो असे म्हणत होता. शनिवार दिनांक.१८ डिसेंबर २०२१ ला सकाळी ८ ते ९ वाजता दरम्यान मृतक प्रफुल चंद्रभान मंगर हा रेल्वे रूळावर आत्महत्या चा प्रयत्न करीत असतांना त्यास तेथुन घेऊन येऊन वडील हे त्याचा उपचाराकरिता त्यास भंडारा येथे दुचाकी ने घेवुन जात असतांना दुपारी १२ वाजता दरम्यान मुलगा मृतक प्रफुल मंगर हयाने दुचाकी वरून रस्त्यावर कुदुन नागपुर बॉयपास राष्ट्रीय महामार्गा वरील सिहोरा कन्हान नदी पुलावरून कन्हान नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. अश्या फिर्यादी वडील चंद्रभान मंगर यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी कलम १७४ जाफौ चा नुसार मर्ग दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अरूण सहारे व शिपाई मंगेश सोनटक्के हे करीत आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …