Breaking News

*कन्हान येथे निःशुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा १५८ नागरिकांनी घेतला लाभ* *८३ लोकांना चष्मे वाटप तर ४२ नागरिकांना ऑपरेशन करिता नागपुर ला रवाना*

*कन्हान येथे निःशुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा १५८ नागरिकांनी घेतला लाभ*

*८३ लोकांना चष्मे वाटप तर ४२ नागरिकांना ऑपरेशन करिता नागपुर ला रवाना*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ नागपुर व महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले असुन शिबीरात ८३ नागरिकांना चष्मे वाटप करून ४२ नागरिकांना महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर येथे ऑपरेशन करिता रवाना करून एकुण १५८ नागरिकांनी लाभ घेत शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले.


रविवार दिनांक़.१९ डिसेंबर २०२१ ला रामकृष्ण मठ नागपुर व महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे निःशुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षा बळीरामजी दखने हायस्कुल मुख्याध्यापिका सौ विशाखा ठमके यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी कन्हान – पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नगरसेवक राजेश यादव, स्वामी ब्रम्हमयानंदजी महाराज, श्री प्रभुजी नवघरे, श्री दिवाकर शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून शिबीराची सुरूवात करण्यात आली. या निःशुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीरात ८३ नागरिकांना चष्मे वाटप करून ४२ नागरिकांना महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर येथे ऑपरेशन करिता रवाना करून एकुण १५८ नागरिकांनी लाभ घेत शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले. याप्रसंगी रामकृष्ण मठ नागपुर व महात्मे आय बॅंक नागपुर चे ५० स्वयंसेवक, शाळेचे शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिक्षिका सौ भाग्यश्री नखाते यांनी तर आभार श्री ज्ञानप्रकाश यादव यांनी मानले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …