*पारशिवनी तालुक्याचा विविध मांगण्याकरिता भाजप ने केले आंदोलन*
*कन्हान ला रस्ता रोको आंदोलन करुन पारशिवनी तहसील कार्यालय वर काढला धडक मोर्चा*
*उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन*
विशेष प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
पारशिवनी / कन्हान – पारशिवनी तालुक्यातील विविध मांगण्याकरिता भाजपा पदाधिकार्यांनी माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन करुन व पारशिवनी येथे गांधी चौक येथुन तहसील कार्यालय वर धडक मोर्चा काढुन शासन प्रशासन च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन तहसीलदार प्रशांत सांगडे , उपविभागीय अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठवुन पारशिवनी तालुक्यातील समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे .
पारशिवनी तालुक्यातील कन्हान , कांद्री, टेकाडी , गोंडेगाव, वराडा , येथील जनहिताच्या विविध मांगण्याकरिता भाजप पदाधिकार्यांनी माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात व कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासन च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठवुन कन्हान परिसरातील विविध समस्यां तात्काळ सोडविण्याची मागणी केली . त्यानंतर पारशिवनी येथे भाजपा पदाधिकार्यांनी माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात गांधी चौक पासुन तर तहसील कार्यालय पर्यंत धडक मोर्चा काढुन शासन प्रशासन च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन तसेच तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा मार्फत शासनाला निवेदन पाठवुन तात्काळ तालुक्यातील विविध समस्या सोडविण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी , रामभाऊ दिवटे , अतुल हजारे , राजेश ठाकरे , डॉ मनोहर पाठक , व्यंकटेश कारेमोरे , नरेश मेश्राम , नरेश पोटभरे , धर्मेंद्र गणवीर , सचिन कामळे , माधव वैद्य , लीलाधर बर्वे , सचिन वासनिक , संजय रंगारी , राजेंद्र शेंदरे , संजय चोपकर , श्रवण वतेकर , शैलेश शेळके , संगीता खोब्रागडे , बबली छानेकर , अनिता पाटील , सुषमा चोपकर , सुरेश चावके , सुषमा मस्के , तुलेषा नानवटकर , सरीता लसुंते , अमन घोडेस्वार , संकेत चकोले , विनोद कोहळे , चंद्रगुप्ता पानतावणे , अजय लोंढे , प्रतीक वैद्य , मनोज गिर्हे , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .