*कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणाचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व कन्हान शहर विकास मंच द्वारे जाहिर निषेध* *दोषियांवर प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी* *कन्हान शहर विकास मंच चे पोलीस निरीक्षक मार्फत राष्ट्रपतींना निवेदन*

*कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणाचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व कन्हान शहर विकास मंच द्वारे जाहिर निषेध*

*दोषियांवर प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी*

*कन्हान शहर विकास मंच चे पोलीस निरीक्षक मार्फत राष्ट्रपतींना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक च्या पुतळ्याची विटंबना काही समाज कंटकाऱ्यांनी केल्याने कन्हान येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी या घटनेचा जाहिर निषेध करुन व कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पावठुन दोषियांवर प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .

 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणानंतर कन्हान राष्ट्रवादी आक्रमक

कन्हान : – कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या पुतळ्याची विटंबना करणा-या समाज कंटकावर कार्यवाही न करता कर्नाटक चे मुख्यमंत्र्यानी छोटी गोष्ट असल्याचे वक्तव्य करणे या प्रकारामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक होत. या घटनेचा जाहीर निषेध केला.
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं आहे. या प्रकारामुळे राज्यात राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. कन्हान शहरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नाग पुर जिल्हाध्यक्ष शिवराय (बाबा) गुजर यांच्या नेतृत्वात शिवाजी नगर कन्हान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुधाने अभिषेक करून महाराजांना पुष्पहार अर्पण करित जय घोष करून कर्नाटक राज्य सरकार व मुख्यमंत्री यांचा निषेध करित राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करित घटनेचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस नागपुर जिल्हाध्यक्ष मा. शिवराज(बाबा) गुजर, जिल्हा महासचिव गणेश पानतावणे, जिल्हा सचिव दलजित पात्रे, रामटेक विधानसभा कार्याध्यक्ष अशोक पाटील , पारशिवनी तालुकाध्यक्ष पुरणदास तांडेकर, रामटेक विधानसभा युवक अध्यक्ष देवीदास तड़स, नागपुर जिला मिडिया सेल महासचिव रोहित मानवटकर, कन्हान शहराध्यक्ष अभिषेक बेलसरे, रामटेक विधान सभा सचिव संगीत भारती, तालुका मिडीया सेल अध्य क्ष शफीक शेख, आंनद बेलसरे, नरेश सोनेकर, लोकेश डहाके सह महिला, पुरूष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपतीय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी

 कन्हान शहर विकास मंच पदाधिऱ्यांचे कन्हान पोलीस निरीक्षक मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

कन्हान : – कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटाकांचा कन्हान शहर विकास मंच व्दारे जाहिर निषेध करून मंच पदाधिकाऱ्यानी कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्फत राष्ट्रपती ला निवेदन पाठवुन दोषींवर प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बेंगळुरु येथील सदाशिव नगर येथे गुरूवार, शुक्रवार च्या मध्यरात्री काही अपराधी तत्वांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांच्या पुतळ्यावर शाई फेकुन अवमान करित विटंबना केली असुन सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने सर्व शिव प्रेमींच्या या घटनेमुळे भावना दु:खावल्याने ठिकठिकाणी संतापाने रोष व्यक्त केला जात असल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात कन्हान येथे जाहिर निषेध करून कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्फत राष्ट्रपती ला निवेदन पाठवुन दोषीयांवर प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरीओम प्रकाश नारायण, सहसचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, हर्ष पाटील, किरण ठाकुर, प्रकाश कुर्वे, अक्षय फुले, शुभम मंदुर कर, शाहरुख खान सह मंच पदाधिकारी प्रामु़ख्याने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …