*कन्हान येथे आज भव्य रक्तदान शिबीर*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – भारत देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य दणका युवा संघटन महाराष्ट्र व कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत हनुमान मंदिर गांधी चौक, पोलीस स्टेशन जवळ कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक.२५ ला सकाळी ९ ते दुपारी २ वाजता पर्यंत पंचायत श्री हनुमान मंदिर गांधी चौक, पोलीस स्टेशन जवळ कन्हान येथे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याकरिता परिसरातील युवक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक रक्तदात्यांनी शिबीरात उपस्थित राहुन महादान, रक्तदान करून लोक सेवे करिता अमुल्य सहकार्य करावे. असे आवाहन दणका युवा संघटन संस्थापक अध्यक्ष योगेश वाडीभस्मे व कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांनी केले आहे. रक्तदान शिबीराच्या यशस्विते करिता दणका युवा संघटन जिल्हाध्यक्ष महेश कारेमोरे, शहराध्यक्ष सुरेश वैद्य, पारशिवनी तालुका शैलेश शेळके, मौदा तालुका विरेंन्द्र पायतोडे, कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरीओम प्रकाश नारायण, महासचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे सह पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज