Breaking News

*कन्हान आनंद नगर येथे युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल*

*कन्हान आनंद नगर येथे युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत आंनद नगर येथील रजत कडबे या युवकाने घरी समोरच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.


पोलीस सुत्रान कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.२२ डिसेंबर २०२१ ला सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान फिर्यादी अभय ईश्वर कडबे वय २२ वर्ष राहणार आनंद नगर कन्हान हा आपल्या परिवार सह घरी हजर असतांना पाण्याची कॅन घासत होता. तेव्हा त्यांची आजी श्रीमती तुळसाबाई हिने ओरडुन सांगितले कि समोरच्या खोलीत मृतक रजत कडबे वय २६ वर्ष राहणार. आनंद नगर कन्हान हा गळफास लावुन लटकला आहे. यावरून तो समोरच्या खोलीत धाव घेतली असता घराच्या छताचे लोखंडी पाट्याला मृतक रजत कडबे हयाने दुपाट्याने गळफास लावुन लटकला दिसल्याने अभय कडबे व मोठा भाऊ शुभम कडबे हयानी मृतक रजत कडबे ला उचलुन गळफास काढला व प्रथम उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता डाॅ योगेश चौधरी हयानी लगेच त्यास कामठी येथे रेफर केले असता तेथील डाॅक्टरांनी मृत घोषित केले. अश्या फिर्यादी अभय कडबे च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी मर्ग क्रमांक ५२/२०२१ कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अरूण सहारे हे करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …