*महादुला भाजप शाखे तर्फे माजी पंतप्रधान स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस उत्सहात साजरा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- भाजप महादुला शाखे तर्फे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस मोठ्या उत्सहाने आनंदाने पंचशील भवन, येथे मिठाई वाटून साजरा करण्यात आला. तसेच स्वर्गिय अटल बिहारी यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी महादुला भाजप अध्यक्ष प्रितम लोहासारवा, भाजप युवामोर्चा अध्यक्ष अभिजीत ढेंगरे, नगरसेवक विजय राऊत, अंकित तुरक, विश्वनाथ चव्हाण, राहूल नागदेवे, भाजपा महिला आघाडी महादुला शाखा अध्यक्ष नंदा तुरक, मायाताई निंदेकार, नगरसेविका सविताताई ढेंगे, राजेश हरिहर, सोमेश्वर चौधरी, पप्पु सोनवणे, नाना लांडे, अयुब परिपगार, सोनवणे आदी उपस्थित होते.