*मंडळ अधिकारी व तलाठ्याचे निलंबन वापस घ्या*
*आगळ्यावेगळ्या आंदोलनाने तहसील परिसराचे वातवरण भक्तीमय तर आगंतुकात उत्सुकता*
*मंडळ अधिकारी व तल्याठ्यांच्या कामबंद आंदोलनास भजन मंडळाची साथ*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः नागपुर जिल्ह्यातील हिंगणा तहसीलच्या वानाडोंगरीचे मंडळ अधिकारी रजेश चुटे व इनासानीचे पटवारी सतिष तिवारी यांच्यावर मतदान यादीच्या कामात तु्टीपुर्ण कार्य केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याच्या कारवाईच्या निषेधार्थ सावनेर तहसील कार्यालयाचे सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी दि.23 डिसेंबर पासुन अनिश्चित कालीन कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सावनेर तालुक्यातील मंडळ अधिकारी व तल्याठ्यांनी आगळेवेगळे प्रयोग करुण भजन व रामनाम जप करुण “इश्वर अल्ला तेरे नाम,सबको संदबुद्धी दे भगवान”च्या गजरात हम सब एक है,हमारी मांगे पुरी करोचा जयघोष करीत संपूर्ण तहसील कार्यालय परीसर दुमदुमून टाकला तर तालुक्यातील खर्डूका येथील बालाजी भजन मंडळाचे दशरथ खेकरे,गजानन कापसे,श्रीकांत मेकलोर,पांडुरंग घोरमारे,तुळसीराम कापसे,भुजंग कापसे,आनंद कापसे व सहकारी मंडळीने टाळ मु्दंगाच्या गजरात कर्णप्रीय भजने गाऊन विरिष्ठ अधिकरार्यांचे लक्ष वेधले*
*तहसील कार्यालय सावनेर च्या पटांगणात मंडळ अधिकारी राजेश वखारे,शरद नांदुरकर,के.एच.कनोजे,अमोल हांडा व प्रविण मेश्राम यांच्या नेतृत्वात आज दि.23 डिसेंबर रोजी सावनेर चे तहसीलदार प्रताप वाघमारे यांना तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या सोपुन तहसील कार्यालयाच्या पटांगणात आंदोलनाला सुरुवात केली असुन जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील निलंबित मंडळ अधिकारी व तलाठी यांचे निलंबन तात्काळ रद्द करुन त्यांना सेवेत समाविष्ट करणे तसेच नेहमी नेहमी तलाठी व मंडळ अधिकार्यांवर होणारे छोटे मोठे अन्याय थांबवावे या मागणीसाठी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या तालुकाजमा करुण सर्वांनी सामुहिक रजेचा अर्ज सादर करुण तालुका प्रशासनाने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या तिव्र भावना जिल्हा प्रशासनाचे माध्यमातून राज्य शासनास कळविण्यात येण्याच्या मागणीचे पत्र तहसीलदार प्रताप वाघमारे यांना सोपविण्यात आले आहे*
*तालुक्यातील सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी अनिश्चित कालीन संपावर गेल्याने तहसील कार्यालयात तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप लटकल्याने अनेकांना उत्पन्नाचे दाखले तसेच शेती संबंधित व खाजगी कामाकरीता तातकाळत फीरावे लागत असुन आज आंदोलनाच्या पाच्या दिवशीही कोणत्याही प्रकारची हलचल होत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव,समाजसेवी आदिंनी आंदोलकांच्या मागण्यावर शासनाने तात्काळ सहानुभूतीने विचार करुण तोडगा काढण्याची मागणी केली आहे सदर आंदोलन राज्यात सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनासारखे असेच पुढे रेटत राहील्यास याची झड़ राजस्वा सह विषेशतः शेतकरी बांधवावर नक्कीच पडेल असे जानकारांचे मत आहे*
*सदर आंदोलनाच्या यशस्वीते करिता गणेश मोरे,ललित बसवार,नंदकिशोर सर्याम,अमित प्रजापती,शारदा ढोबळे,पवन बागडे,रचना चव्हाण,रोहिणी रंगारी,मोहिणी वरघट,अरोही राठोड,गीता पाटील,वर्षा लाले,व्हि एस खांबलकर,देविदास अंभोरे,राहुल नेहारे,चंद्रकांत कळणे,आशिष झोडापे,मनोज रामटेके,अश्वीन वनारकर,प्रीती फुकट,माधुरी तराळे,अपुर्वा बन्सोले,नितेश मोहितकर,संदीप नखाते सह तालुक्यातील इतर सर्व महिला पुरुष तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनात नित नवे प्रयोग करुण शासनाचे लक्ष वेधण्याच्या तयारीला लागले आहे*