*जूनी पेन्शन योजना लागू करा* *शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ सोडवा- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी*

*जूनी पेन्शन योजना लागू करा*

*शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ सोडवा- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी*

विशेष प्रतिनिधी-  सुरेशकुमार बरे

वर्धाः सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जूनी पेन्शन योजना लागू करून जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चातील सर्व कर्मचारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अटक केल्याचा निषेध करून तात्काळ सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या व इतर समस्या तात्काळ सोडविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे सोमवार दि.२७ डिसेंबर 2021 रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत मा. व्ही. यु. डायगव्हाणे( अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, मुंबई तथा माजी शिक्षक आमदार) यांचे नेतृत्वात मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. वर्धा यांचे कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.*

*यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शासनास पाठविण्यात आले, त्यात 1) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित / अंशतः अनुदानित शाळा / तुकडीवर नियुक्त शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करुन त्यांचे प्रलंबित ६ व्या वेतन आयोगाचा तिसरा, चौथा, पाचवा हप्ता तात्काळ अदा करणे, 2) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली अंशदायी निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना रद्द करुन १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे, 3) दि. १२/१५ फेब्रुवारी २०१५ शासन निर्णयान्वये अनुदानास अपात्र ठरलेल्या शाळा / तुकड्यांना तात्काळ त्रुटींची पूर्तता करुन अनुदानास पात्र घोषित करणे व निधीची तरतुद करणे, 4) भविष्य निर्वाह निधी परतावा / नापरतावा, वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरण व इतर देयके मंजुरात करण्यासंदर्भाने शालार्थ प्रणालीमध्ये बंद करण्यात आलेली टॅब (बिडीएस) तात्काळ सुरु करणे, 5) १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे , 6) नागपूर जिह्यात सातव्या वेतन आयोगाचा पहिला हफ्ता तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता तात्काळ देणे या व इतर अनेक प्रलंबित मागण्याचे निवेदन वर्धेच्या शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) मा. माधुरी सावरकर मॅडम यांचे मार्फत मा. मा. मुख्यमंत्री साहेब, मा.उपमुख्यमंत्री साहेब, मा. शिक्षणमंत्री, मा. वित्तमंत्री व इतर संबंधित अधिकारी यांना पाठविण्यात आले. तसेच यावेळी मा. शिक्षणाधीकारी सौ माधुरी सावरकर यांचेशी वर्धा जिल्ह्यातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी मा. शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ प्रलंबित सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी मा. व्ही. यु. डायगव्हाणे, विमाशीचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष मा. पांडुरंगजी भालशंकर, कार्यवाह महेंद्र सालंकार, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेशकुमार बरे, कु. सिमा खेडकर,कविता मेश्राम,सौ जगताप मॅडम, विष्णुजी इटनकर,बि. एस. पाटील, वर्धा तालुकाध्यक्ष रवींद्र वाघमारे, सेलु तालुकाध्यक्ष,सुभाष तेलरांध्ये,गोपाल खंडागळे, प्रविण देशमुख, इंद्रजीत ढोले, नितिन खराबे, विजय जुगनाके,सौ रेखा जुगनाके, संदीप चवरे,श्याम चित्रकार, दिनेश गोमासे,विजय वघळे, यशवंत गडवार,राजेंद्र उभाटे,प्रकाश गुजर,गोपाल बावनकर,हिवंज सर तसेच विमाशी व खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …