Breaking News

*कन्हान – तारसा महामार्गा वर ट्रक व दुचाकी चा भीषण अपघात* *एका युवकाचा मृत्यु तर दोन गंभीर जख्मी*

*कन्हान – तारसा महामार्गा वर ट्रक व दुचाकी चा भीषण अपघात*

*एका युवकाचा मृत्यु तर दोन गंभीर जख्मी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गग तारसा महामर्गा वरील खंडाळा (निलज) गावाजवळ ट्रक व दुचाकी चा भीषण अपघात झाल्याने एका युवकाचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर दोन गंभीर जख्मी झाल्याची माहिती समोर येत आहे .


सुत्रान कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान ते तारसा महामार्गा वरील खंडाळा गावाजवळ एका दिवसा पासुन रस्त्यावर फेल झालेला ट्रक उभा आहे . सोमवार दिनांक.२७ डिसेंबर ला रात्री ०८:३० ते ०९:१५ वाजता दरम्यान दुचाकी वाहन चालक मृतक इरफान हा आपल्या दोन मित्रान सोबत तारसा कडुन कन्हान कडे येत होता . या दरम्यान तारसा कडुन येणाऱ्या दुचाकी वाहन चालक मृतक इरफान यास खंडाळा गावा जवळ रस्त्यावर उभा असलेला फेल ट्रक अंधारात न दिसल्याने दुचाकी वाहन चालक मृतक इरफान याने ट्रक ला मागुन जोरदार धडक दिली . या झालेल्या अपघातात दुचाकी चालक मृतक इरफान याचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर दोन युवक गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारा करिता खाजगी रुग्णालयात दाखल केले असुन गंभीर जख्मी जुम्मन व अज्ञात युवकाची हालत अंत्यत नाजुक असल्याचे बोलल्या जात आहे.
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतक वाहन चालक इरफान यास शवविच्छेदना करिता कामठी रुग्णालय येथे नेले आहे .
बातमी लिहल्या पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झालेली नाही .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …