*मंडळ अधिकारी व तलाठ्याचे निलंबन वापस घ्या* *मंडळ अधिकारी तलाठ्यांनी तहसील परिसरात जलेबी वाटून नोंदवली निषेध*

*मंडळ अधिकारी व तलाठ्याचे निलंबन वापस घ्या*

*मंडळ अधिकारी तलाठ्यांनी तहसील परिसरात जलेबी वाटून नोंदवली निषेध*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः नागपुर जिल्ह्यातील हिंगणा तहसीलच्या वानाडोंगरीचे मंडळ अधिकारी रजेश चुटे व इनासानीचे पटवारी सतिष तिवारी यांच्यावर मतदान यादीच्या कामात तु्टीपुर्ण कार्य केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याच्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या सातव्या दिवशी सावनेर तालुक्यातील मंडळ अधिकारी व तल्याठ्यांनी आगळेवेगळे प्रयोग करत तहसील कार्यालय परिसरात जलेबी वाटप करुण हम सब एक है,हमारी मांगे पुरी करोचा जयघोष करीत संपूर्ण तहसील कार्यालय परीसर दुमदुमून विरिष्ठ अधिकरार्यांचे लक्ष वेधले*

*तहसील कार्यालय सावनेर च्या पटांगणात मंडळ अधिकारी राजेश वखारे,शरद नांदुरकर,के.एच.कनोजे,अमोल हांडा व प्रविण मेश्राम यांच्या नेतृत्वात 23 डिसेंबर पासून सावनेर चे तहसीलदार प्रताप वाघमारे यांना तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या सोपुन तहसील कार्यालयाच्या पटांगणात आंदोलनाला सुरुवात केली असुन जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील निलंबित मंडळ अधिकारी व तलाठी यांचे निलंबन जोपर्यंत रद्द करुण त्यांना सेवेत समाविष्ट करण्यात येत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरुच ठेवण्यात येईल व या मागणीसाठी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या तालुकाजमा करुण सर्वांनी सामुहिक रजेचा अर्ज सादर करुण आंदोलनात सहभागी होत आहेत*

*तालुक्यातील सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी अनिश्चित कालीन संपावर गेल्याने तहसील कार्यालयात तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात शुकशुकाट असल्याने अनेकांना उत्पन्नाचे दाखले तसेच शेती संबंधित व खाजगी कामाकरीता तातकाळत फीरावे लागत असुन आज आंदोलनाच्या सातव्य दिवशीही कोणत्याही प्रकारची हलचल होत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव,समाजसेवी आदिंनी आंदोलकांच्या मागण्यावर शासनाने तात्काळ सहानुभूतीने विचार करुण तोडगा काढण्याची मागणी केली आहे सदर आंदोलन पुढे रेटत राहील्यास याची झड़ राजस्वा सह विषेशतः शेतकरी बांधवावर नक्कीच पडेल असे जानकारांचे मत आहे*

*सदर आंदोलनाच्या यशस्वीते करिता गणेश मोरे,ललित बसवार,नंदकिशोर सर्याम,अमित प्रजापती,शारदा ढोबळे,पवन बागडे,रचना चव्हाण,रोहिणी रंगारी,मोहिणी वरघट,अरोही राठोड,गीता पाटील,वर्षा लाले,व्हि एस खांबलकर,देविदास अंभोरे,राहुल नेहारे,चंद्रकांत कळणे,आशिष झोडापे,मनोज रामटेके,अश्वीन वनारकर,प्रीती फुकट,माधुरी तराळे,अपुर्वा बन्सोले,नितेश मोहितकर,संदीप नखाते सह तालुक्यातील इतर सर्व महिला पुरुष तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …