*कन्हान येथे ६ महिन्याचा बाळ आढळला कोरोना पाॅझीटिव्ह*
*जिल्हाधिकाऱ्यां च्या आदेशाला नगर परिषद , कन्हान पोलीस , व आरोग्य विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – नागपुर जिल्ह्यात काही दिवसान पासुन कोरोना व ओमिक्राॅन चे रुग्ण दिवसन दिवस वाढत असल्याने राज्य शासना ने नवीन नियमावली लागु केल्या वर ही कन्हान परिसरात राज्य शासना च्या व जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला स्थानिक प्रशासन नजर अंदाज करीत असल्यामुळे शिवनगर कन्हान येथील सहा महिन्याचा बाळ कोरोना पाॅझीटिव्ह आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन नगर परिषद प्रशासन , कन्हान पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग प्रशासन च्या कार्यप्रणाली वर पुन्हा एखदा प्रश्न निर्माण झाले आहे .
देशात , राज्यात , जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना व ओमिक्राॅन चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य शासना ने संपुर्ण राज्यात नवीन नियमावली लागु केली असुन जिल्हाधिकार्यांनी संबंधित विभागाला , प्रशासनाला कोरोना व ओमिक्राॅन पासुन आटोपण्याकरिता दिशा निर्देश दिले असुन सुद्धा कन्हान शहरात व परिसरात स्थानिक प्रशासन च्या दुर्लक्षा मुळे कोरोना काळातील सर्व नियमाचे उल्लंघन होत असल्यावर ही नगर परिषद प्रशासन , कन्हान पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग प्रशासन कुंभकर्णी च्या झोपेत असल्याने शहरात कोरोना व ओमिक्राॅन चा विस्फोट होण्याची दाट शक्यता वाढली आहे .
याच महिन्यात बुधवार दिनांक १ डिसेंबर ला वेकोलि टेकाडी नवीन वसाहत येथील रहिवासी १८ वर्षीय ईसम कोरोना पाॅझीटिव्ह आढळुन आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती . त्यांनतर सुद्धा नगर परिषद प्रशासन , कन्हान पोलीस प्रशासन आरोग्य विभाग प्रशासन यांच्या दुर्लक्षा मुळे शहरात कोरोना चा प्रादुर्भाव हळु हळु वाढत असुन गुरुवार दिनांक ३० डिंसेबर ला शिवनगर तारसा रोड कन्हान येथील सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह आल्याने त्याला नागपुर येथील किंग्सवेे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या घरच्यांची कोरोना तपासणी केली असता सर्वाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोना रूग्णाची संख्या कमी झाल्यानंतर गत काही दिवसा पासुन कोराना रूग्ण वाढत असुन ओमिक्रॉन व्हेरियंट चा सुध्दा धोका सामोर असल्याने नागरिकांनी स्वयंफुर्त लसीकरण करून शासना च्या निर्बधाचे काटेकोर पणे पालन करित हाथ वारंवार स्वच्छ धुणे, गर्दी मध्ये जावु नये, मास्क चा वापर करावा. असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ . योगेश चौधरी यांनी केले आहे.