*C.S.T.P.S चा भोंगळ कारभार*
*प्रशिक्षणार्थ्याच्या पगारामध्ये अदला-बदल*
*आवारपूर प्रतिनिधि :गौतम धोटे –
चंद्रपूर-* सीएसटीपीएस मध्ये असलेल्या महाऔद्योगिक विद्युत कंपनी मध्ये शिकावू उमेदवारांच्या पगारामध्ये अदलाबदल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिकावू उमेदवार एक वर्षाच्या कालावधीत मध्ये उमेदवारांचे पगार 12,900/- रुपये व दोन वर्षे कालावधी मध्ये उमेदवारांना 11,400/- रुपये इतके मिळाले. हे पगार दोन वर्षे उमेदवारांना मान्य नसून त्यांनी ऊर्जामवतात दि.15/11/2019 साय.5:00 वाजता भेट दिली व विचारणा केली असता, तिथं कार्यरत कर्मचार्यांनी न पटणारे शब्द वापरून उत्तर दिले. व सांगितले की एक वर्ष असलेल्या उमेदवारांचे पगार तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. अश्या प्रकारे अदलाबदली च्या कारभारामुळे दोन वर्षे शिकावू उमेदवारांनामध्ये भिती व (चिंता) निमार्ण झाली आहे. असे उमेदवांना कडून सांगण्यात येत आहे.
सबंधित अधिकाऱ्यानी लक्ष लावून या अदलाबदलीचा प्रकार थांबवण्यांची मागणी होत आहे.