*जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी लंगर शेड चे भुमिपुजन करून वचन पुर्ती*

*टेकाडी स्थित गुरूद्वारा येथे लंगर शेड करिता निधी मंजुर*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – टेकाडी (कोयला.खदान) गाव मार्ग रस्ता वचनपुर्ती नंतर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी श्यामकुमार बर्वे यांनी टेकाडी नविन वसाहत येथील नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरीव गुरूद्वारा येथे लंगर शेड करिता निधी मंजुर करून वचनपुर्ती केली आहे.
नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा लगत असलेल्या वेकोली ची टेकाडी नविन वसाहत येथे असलेल्या गुरूव्दारा मध्ये सिख धर्माचे अनुयायी अनेक स्थाना वरून लंगर करिता येत असतात परंतु येथे लंगर चा शेड नसल्यामुळे असुविधेचा सामना करावा लागत असल्याने सिख समाज कडुन भरपुर दिवसा पासुन लंगर करीता शेड ची मागणी करण्यात आली होती. या महत्वाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करित जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांनी लंगर शेड करिता निधी मंजुर करून रविवार दिनांक.२ जानेवारी २०२२ ला टेकाडी नविन वसाहत गुरूव्दारा येथे लंगर शेड चे भुमिपुजन जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते करून वचन पुर्ती करण्यात आली.



याप्रसंगी माजी विधानपरिषद सदस्य एस.क्यु.जामा, पंचायत समिति.सभापती मिनाताई कावळे, पंचायत.समिती. सदस्य करूणाताई भोवते, सरपंच मीनाक्षी बुधे, ग्रामपंचायत सदस्य आशा राऊत, संध्या सिंह, मंजु जम्बे, दिनेश चिमोटे, विष्णु राउत, धनराज कारेमोरे, महेश झोडावने, पप्पु जामा, मुन्ना जामा, रंजीत सिंह, टीपु सिंह, गौरी शंकर सिंह, शिवाजी सिंह, राकेश सिंह, फिरदोस्त भाई , सदरे आलम खान, बीरेंद्र सिंह, मुरली श्रीवास्तव, राजेश शाही, कमलेश गोस्वामी, प्रताप सिंह राजपुत, नदीम जामा, राजेन्द्र पाल सिंह, निक्कु जम्बे, जसपाल जम्बे, विनोद पाली, करण परमार, विक्रम परमार, निकेश मेश्राम, आकाश रहिले, निखिल श्रीवास्तव, विकास ठाकरे, कमल भंडारी सह आदि मान्यवर व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज