*गहुहिवरा परिसर माॅडन लॅड डेवलपर्स येथुन २५,४९७ रुपयांचे लोखंडी सलाखी चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ४ किलो मीटर अंतरावर असलेल्या गहुहिवरा परिसर माॅडन लॅड डेवलपर्स येथुन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या प्लाॅट नंबर १०३ मधुन २५,४९७ रुपयांचे लोखंडी सलाखी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी चंदु उमराव नागपुरे वय ३६ वर्ष राहणार हनुमान नगर डफाळे ले आऊट कन्हान हा प्रायवेट प्लंबर चे काम करत असुन त्याचे स्वताचे प्लॅट गहुहिवरा परिसरात माॅडन लॅड डेवलपर्स १०३ येथे ५००० स्क्वेयर फीट प्लाॅट असुन तिथे काजु मॅनफॅक्चरींग टाकने सुरु असल्याने फिर्यादी चंदु उमराव नागपुरे ह्याने सध्या कंक्ट्रक्शन चे काम सुरु केले असुन फिर्यादी चंदु उमराव नागपुरे ह्यांनी दिनांक १३ डिसेंबर ला पारस ब्लिडिंग मटेरियल सप्लायर्स कांद्री येथुन १२ एमएम , १० एमएम , ३३० एमएम , ८ एमएम , चा लोहा ८६९६० हजारांचा विकत घेतला होता व आपल्या प्लाॅट वर नेऊन ठेवला होता . त्यातला काही खर्च केला व फिर्यादी चंदु उमराव नागपुरे यांची देखरेख असुन प्लाॅट वर जोत्यापर्यंत काम झालेले आहे . दिनांक २७ डिसेंबर २०२१ ला फिर्यादी चंदु उमराव नागपुरे हा दिवसभर प्लाॅट वर गेला नसल्याने रात्री ०८:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी चंदु उमराव नागपुरे ह्यांना खेडी गावातील राहणारा अभिजीत गांधी यांनी फोन करुन सांगितले कि तुझ्या प्लाॅट वर चा लोहा रोडावर पडलेला दिसत आहे . तेव्हा फिर्यादी चंदु उमराव नागपुरे हा ८:३० वाजता च्या दरम्यान प्लाॅट वर पोहोचला असता त्यांना रोडावर लोहा पडला दिसला असुन फिर्यादी चंदु उमराव नागपुरे ह्यांनी लोहा उचलला नाही व ९:३० वाजता च्या दरम्यान तीन , चार लोक दुचाकी वाहना ने लोहा उचलण्याकरिता आले तेव्हा फिर्यादी चंदु उमराव नागपुरे हा त्यांचा मागे धावला असता एक दुचाकी वाहन अॅक्टीवा क्रमांक एम एच ३१ बजे ७२९८ ही वाहन सोडुन ते लोक पडुन गेले व फिर्यादी चंदु उमराव नागपुरे यांचा आधी त्या चोरट्यांनी लोहा अंदाजे १२ एम एम चे सात बंडल किंमत अंदाजे १९ , ७७७ व १० एम एम चे दोन बंडल किंमत अंदाजे ५७२० रुपए चा माल फिर्यादी चंदु उमराव नागपुरे ह्यांना दिसला नसल्याने त्या अज्ञात चोरट्यांनी एकुण २५ , ४९७ रुपयांचे लोखंडी सलाखी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी चंदु उमराव नागपुरे यांचा तोंडी रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ४७१/२०२१ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज