*कन्हान परिसरात १५ ते १८ वयोगटातील पहिल्या ४१३ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले*
*जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या हस्ते १५ ते १८ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा शुभारंभ.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – राज्य शासना च्या आदेशानुसार ३ जानेवारी पासुन १५ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण सुरू करून पहिल्याच दिवसी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे धर्मराज विद्यालयात २४५ व इतर १२८ असे ३७३ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे अखिलेश हायस्कुल साटक चे २८ व गावातील बाहेर गावी शिक्षण घेणारे १२ असे ४० विद्यार्थ्यांचे लसीकरण करून कन्हान परिसरात एकुण ४१३ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आर्देशान्वये सोमवार (दि.३) जानेवारी पासुन १५ ते १८ वयोगटातील मुला चे लसीकरण शुभारंभ करून शाळा, महाविद्यालयात लसीकरण करण्यात येत असुन पहिल्या दिवसी कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान येथे जिल्हा परिषद नागपुर अध्यक्षा सौ रश्मीताई श्याम कुमार बर्वे यांच्या हस्ते आणि जिल्हा आरोग्य वैद्यकिय अधिकारी, जिल्हा उप आरोग्य वैद्यकिय अधिकारी, पंचायत समिति पारशिवनी सभापती मिनाताई कावळे, पंचायत समिति सदस्य करूणा भोवते, तालुका वैद्यकिय प्रशांत वाघ, कन्हान वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश चौधरी, कांद्री सरपंच बळवंत पडोळे, धर्मराज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिता वासनिक सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण १५ ते १८ वर्ष वयो गटाचे लसीकरण सुरू करून पहिल्याच दिवसी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे धर्मराज विद्यालयात २४५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ला ७१, कोलमाईन्स ०४, टेकाडी ३१, गहुहिवरा १४, पिपरी ०८ असे एकुण ३७३ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे अखिलेश हायस्कृल साटक येथील २८ व साटक येथील बाहेर गावी शिक्षण घेणारे १२ असे एकुण ४० विद्यार्थ्यांचे लसीकरण करून कन्हान परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ३७३ व साटक ४० असे एकुण ४१३ विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवसी लसीकरण करण्यात आले.