*तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या प्रयत्नातून तहसील कार्यालयाचा कायापालट*
*जिल्हाधिकारी आर.विमल यांनी तहसीलदारांच्या कार्याची केली प्रशंसा*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः सावनेर तहसील कार्यालयातील आतील परिसरात शासनाच्या “सुंदर माझे कार्यालय” या योजने अंतर्गत व तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण करण्यात आले.
*महाराष्ट्र राज्य शासनाच्या “सुंदर माझे कार्यालय” या योजनेनूसार तहसील कार्यालयातील भींतीवर शासनाच्या विविध योजनांचे मोठे फलक लावण्यात आले असुन आता प्रत्येक नागरिकांना कोणत्याही योजनेबद्दल माहिती अथवा कागदपत्रे याकरीता भटकंती करावी लागणार नसुन कोणत्या योजनेला कीती कालावधी लागेल याचाही सदर फलकावर उल्लेख करण्यात आला असल्याने नागरिकांना सोईचे जात आहे.
*कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयातील आतील भागला वेगळेच लुक आले असुन स्वातंत्र्याचा अमु्त महोत्सवानिमित्ताने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या कोलार नदिच्या सफाई आयोजनाच्या निमित्ताने सावनेर नगरीत मा.आर.विमल यांची विषेश उपस्थिती होती सदर आयोजनानंतर मा.जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयाची पहाणी करुण तहसिलदार प्रताप वाघमारे यांचे प्रयत्नातू तहसील परिसरातील कायापालट बघून समाधानी व्यक्त करत म्हटले की सावनेर तहसीलदार यांनी शासनाच्या “सुंदर माझे कार्यालय” या योजनेतून केलेल्या कार्याची दखल नागपुर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र घेईल त्यामुळे राज्यातील सर्व तहसील कार्यालयांना आपले कार्यालये सुंदर करण्याची प्रेरणा मीळेल असा विश्वास व्यक्त केला*