Breaking News

*बोरडा येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश*

*बोरडा येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश*

रामटेक प्रतिनिधी : पंकज चौधरी

रामटेक – तालुक्यातील बोरडा (सराखा) येथे ३ जानेवारीला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, सावित्रीबाई फुले जयंती व मुग्दाई जयंती निमित्ताने आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ शाखा, बोरडा येथे, आकाशझेप फाउंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा बोरडा येथे महा रक्तदान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, आकाशझेपचे संचालक वैभव तुरक, सहकारी जितेंद्र वलोकर प्रामुख्याने उपस्थित होते. आय,जी,जी,एम,सी,च्या बीटीओ डॉ. ओमिका, चेतन मेश्राम, वंदना भगत, अनिल खोटे आणि वैद्यकीय चमूने उत्तमरित्या रक्तसंकलन केले.
यावेळी अमोल जांभुळे, अतुल कुरमतकर, सारंग राऊत, विक्रम नागपुरे, आकाश लांजेवार, अनिल धारणे, नितेश चौधरी, लक्ष्मण धोटे, ईश्वर गरमडे, नरेश चौधरी, प्रमोद गजभे, धीरज सोनवाणे, पराग गजबे, स्वप्निल जांभुळे, अमित जांभुळे, तुषार घरत, राकेश चौधरी, कोमल ढोमने, उर्मिला दडमल, आयुष ढोमणे, निलेश नारनवरे, यशपाल जीवतोडे, कल्पना श्रीरामे, गंगाधर भुजाडे, अरुणा धोटे, बबन हजारे, पंकज सोनवाणे, किशोर ढोंगे, राजेंद्र राऊत, दिव्यांनी नारनवरे, रोशन डडमल, विनोद गजभिये, रामलाल दोडके, राघव नारनवरे, राहुल ढोमने, आशीष भूजाडे, कवडू डडमल, मुकेश डडमल, रूपेश चौधरी, संदीप धारणे, प्रफुल ठाकूर, सागर नारनवरे, अनिकेत नेवारे, आदित्य बोरकर, विक्रम श्रीरामे, अशोक राऊत, अनिकेत ठाकूर, आकाश दोडके अशा ५० तरुणांनी रक्तदान करून मानवता व राष्ट्रीयतेचा कृतिशील संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज चौधरी,प्रवीण गजबे,लव डडमल,अमीर धोटे यांनी विशेष प्रयत्न केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …