*आणि बंटी पोहचला त्याचा घरी*
ल
*हितेश बंन्सोड व त्यांच्या टिमच्या प्रयत्नाला यश…*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः गेल्या 6 दिवसापासून घर भटकलेल्या थोडं मानसिक मनोरुग्ण असलेल्या बंटीला समाजसेवी हितेश बंन्सोड यांच्या प्रयत्नानी व सोशल मिडियाच्या मदतीने त्याला घर मिळण्यास मदत केली*
*चार पाच दिवसाआधी रात्रीला भन्साळी टाकळी येथून हितेश बंन्सोड यांना फोन येतो आणि आमचा गावात एक अनोळखी व्यक्ती आलं आहे.अशी माहिती मीळताच हितज्योती फाउंडेशन टीमचा सदस्य राजा त्याला घेण्यासाठी जातो आणि घेऊन घरी येतो, आम्ही त्याची विचारपूस केली असता तर स्वतःचे नाव बंटी सुधाकर आईचे नाव प्रतिमा इतकेच सांगत होता*
*त्याला थोड़े मानसिक आजार असल्याने तो आपला परिचय स्पष्टपणे देऊ न शकल्यामुळे त्याच्या एक व्हिडिओ तयार करून नागपूर सह इतरत्र सर्व मित्रांना शेअर केला आहे त्या मित्रांनी सुद्धा या व्हिडिओला बऱ्याच व्हाट्सअप ग्रुपला शेअर केला आणि तो त्याच्या भावा पर्यंत पोहोचला जरीपटका पोलिस स्टेशन नागपूर येथे संबंधित बंटी ची मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आपला एक छोटासा प्रयत्न आणि सोशल मीडिया ची साथ यामुळे पुन्हा बंटीला त्याच्या आधार मिळाला याचा आनंद हितज्योती फाऊंडेशन व्यक्त करत आहे..*
*हितज्योती चे कार्यकर्ते बंटीला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला असता बंटीला बघताच त्याच्या वडिलांना रडू आवरले नाही शेवटी मुलगा कसाही असला तरी आई-वडिलांना प्रिय असतो सदर मुलाचे नाव बंटी सुधाकर बोदोले असे असुन तो नागपूर मार्टीन नगर येथे राहतो.सोशल मीडियाच्या माध्यमातून बंटीला त्याचे परिवाराशी मिळवून देण्याकरिता सोशल मीडियावर सहकर्य दिल्याबद्दल हितेश बंन्सोड व हितज्योती फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले*
*लावारिस,बेवारस,मनोरुग्णांन सोबतच रस्ते अपघातात जिवापाड मदत करण्यासाठी हितेशदादा बंन्सोड व त्यांच्याव्दारा स्थापित हितज्योति आधार फाऊंडेशन सावनेर जिल्हा नागपूर यांच्या सामाजिक कार्याची सर्वत्र स्तुती केल्या जात आहे*