Breaking News

*न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी* *शाळेत मुलींसाठी भाषण स्पर्धा आणि काव्य स्पर्धा*

*न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

*शाळेत मुलींसाठी भाषण स्पर्धा आणि काव्य स्पर्धा*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः अभ्यंकर प्राथमिक शाळा सावनेर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सहभागी सर्व मुलींनी अतिशय सुंदर सादरीकरण केले.यात सर्वोत्कृष्ट भाषण आणि काव्य सादर करणा-या मुलींना अँडव्होकेट भोजराज सोनकुसरे आणि तनिष्का ग्रुपच्या सदस्या सौ.सोनालीताई तुषार उमाटे यांचेहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.तसेच शाळेतील शिक्षिका सौ.नर्मदा संजय डवरे ,प्रणोती प्रफुल सहारे यांनीही आपल्या कवितेतून सावित्रीबाई फुले यांना मानवंदना दिली.*

कार्यक्रमाच्या अध्यया सौ.अनिता गणेश झाडे यांनी स्पर्धात्मक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांचा कसा सर्वांगीण विकास होतो याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.माणिक वामन रामटेके सर यांनी तर आभारप्रदर्शन सौ.नर्मदा डवरे मॅडम यांनी केले.यावेळी जेष्ठ शिक्षक श्री.सुरेश एन.गजभे,सौ.ज्योती जे.घोडाम,कु . तनुजा तु.नंदेश्वर,कु.दिप्ती डी.खोब्रागडे,कु.प्रणोती संसारे,कु.प्रज्ञा बागडे,कु.अंजली पगारे , अनुसया नारेकर (शिपाई),विजुताई श्रीवास्तव (शिपाई) यांनी सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …