*कल्याणी सरोदे ला राज्यस्तरीय युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार* *कल्याणी सरोदे ला गुणीजन गौरव पुरस्कार प्रदान*

*कल्याणी सरोदे ला राज्यस्तरीय युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार*

*कल्याणी सरोदे ला गुणीजन गौरव पुरस्कार प्रदान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांद्री ची कु.कल्याणी सरोदे यांना राज्य स्तरीय पुरस्कार युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. बेस्ट मेकअप आर्टिस्ट युथ इतक्या कमी वयात त्यांनी इंटरनॅशनल अवॉर्ड व नॅशनल अवॉर्ड पारितोषिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला आहे. त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय युथ आयडल गौरव पुरस्कार मानकरी म्हणुन सन्मानित करण्यात आले.


बुधवार दिनांक.२९ डिसेंबर २०२१ ला मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थे च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शहरातील सोशल सभागृहात दादर येथे थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतुन पुरस्कारासाठी निवडलेल्या २५ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरव पदक, सन्मान चिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला. यात कांद्री- कन्हान रहिवासी कल्याणी सरोदे ला राज्य स्तरीय पुरस्कार युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तन कार ह.भ.प.श्री.श्यामसुंदर महाराज सोन्नर हे सोहळ्या ला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. बीज भाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतानी भारतीय संविधानाला अपेक्षित अशी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मुल्ये समाजात खोलवर रुजविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. सुप्रसिध्द साहित्यिक रमेश आव्हाड हे या समारंभाचे अध्यक्ष होते. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि इंटरनॅशनल एज्युकेशन आयकॉन सौ. हेमाली जोशी या विशेष पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. समारंभाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या सौ. मनिषा कदम यांनी केले. गुणीजन परिवाराचे पदा धिकारी प्रकाश सावंत, लक्ष्मणराव दाते, अमोलराव सुपेकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …