*न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” आणि “राजमाता जिजाऊ” यांची जयंती उत्साहत साजरी*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना थोर पुरुषाचे स्मरण असावे व त्यांच्यात लपलेल्या सुप्तगुणांचा विकास विकास व्हावा याकरिता अभ्यंकर प्राथमिक शाळा येथे वेशभूषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
*तर विद्यार्थ्यांसाठी उद्बबोधन वर्गाचे ही आयोजन करण्यात आले.याप्रसंगी नगरीतील प्रसिद्ध दंत चिकित्सक डाॅ.मोनाली पोटोडे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना विषयी माहिती देत कोरोनाची लक्षणे व त्यापासून सुरक्षित राहणेचे मार्गदर्शन केले*
*कार्यक्रमाचे संचालन दिप्ती खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.ज्योती घोडाम यांनी केले. उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सादरीकरण करणा-या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ..आशाताई कराळे यांचे कडून बक्षिस वितरण करण्यात आले.*
*सदर आयैजनाला मुख्याध्यापिका सौ अनिता गणेश झाडे,सहा.शिक्षिका तनुजा नंदेश्वर,नर्मदा डवरे,प्रणोती संसारे,प्रज्ञा बागडे,अंजली पगारे उपस्थित होत्या.*