Breaking News

सावनेर अरविंद इंडो पब्लिक स्कूल मध्ये इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरी करण्यात आली.

*इंदिरा गांधी जयंती संपन्न*

विशेष प्रतिनिधि

सावनेरःअरविंद इंडो पब्लिक स्कूल मध्ये इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरी करण्यात आली.
सावनेर- अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये इंदिरा गांधी जयंती तसेच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला सर्व प्रथम इंदिरा गांधी ह्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.वर्ग ७वी च्या विध्यार्थ्यांनि ‘ राष्ट्रीय एकता दिवस’ ह्यावर लघु नाटिका प्रस्तुत केली ह्यावरून समाजात होणाऱ्या जाती ,धर्म यावरील भेदभाव मिटवून आपण सर्व एक आहो असे विध्यार्थ्यांन समोर राष्ट्रिय ऐकता बद्दल संदेश दिला.इंदिरा गांधी यांची वेशभूषात हिमानी नकोसे हिने आपल्या भाषणात राष्ट्रीय एकता सुंदर असा संदेश दिला. स्कूल चे प्राचार्य डॉ. राम कुमार शर्मा सर ह्यांनी विद्यार्ध्याना ह्या दिवसाचे महत्व पटवून दिले जातिभेद सोडून आपण सर्व एक आहो असा संदेश दिला. तसेच देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्राबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


सदर आयोजनास मीनाक्षी वैद्य, ज्योति पारधी, स्नेहा बोन्द्रे, अश्विनी उलमाले, सविता मते, स्मिता अटाळकर,सोनाली कोल्हे, मीना अजमेरा आणि शिक्षक व शिक्षकेत्तर ह्या सर्वांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहयोग केला .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …