*जुन्या पैशाच्या वादावरुन आरोपी ने एका युवका वर धारदार वस्तु ने केला जिवघेणे हल्ला*
*युवक गंभीर जख्मी , मेयो रुग्णालय येथे उपचार सुरू*
*घायल फिर्यादी युवक तर्फे सरकार तर्फे पोलीस हवालदार यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत एक किलो मीटर अंतरावर असलेल्या आंबेडकर चौक येथील पंजाब नॅशनल बॅंक समोरील आवारत देशी दारु दुकाना जवळ जवाहर नगर कन्हान येथे एका आरोपी ने जुन्या पैशाच्या वादावरुन फिर्यादी ला शिवीगाळ करुन व धारदार वस्तुने उजव्या हाताच्या दंडावर व गळ्यावर वार करुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी घायल फिर्यादी युवक तर्फे सरकार तर्फे पोलीस हवालदार यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक ०८ जानेवारी २०२२ ला रात्री ८:३० ते ८:५० वाजता च्या दरम्यान आशिष विजयसिंग ठाकुर वय २४ वर्ष राहणार गणेश नगर कन्हान हा आपल्या मित्रासह बसला असता आरोपी गौरव ऊर्फ तेनाली संतोष मधुमटके राहणार अशोक नगर कन्हान ह्याने फिर्यादी आशिष विजयसिंग ठाकुर ह्याला म्हटले कि “तु ज्यादा बात कर रहा है क्या ?” असे बोलुन जुन्या पैशाच्या वादाच्या कारणावरुन फिर्यादी आशिष विजयसिंग ठाकुर यास अश्लील शिवीगाळ करुन व स्वत:हा जवळील कोणत्यारी धारदार वस्तुने उजव्या हाताच्या दंडावर तसेच फिर्यादी आशिष विजयसिंग ठाकुर यास जिवे मारण्याचा उद्देशाने फिर्यादी च्या गळ्यावर वार करुन गंभीर जख्मी केले .
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन घायल फिर्यादी आशिष विजयसिंग ठाकुर यास प्रथम उपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन त्याला जख्म जास्त असल्याने मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर करण्यात आले असुन घायल युवकावर उपचार सुरू आहे .
सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी आशिष विजयसिंग ठाकुर तर्फे सरकार तर्फे पोलीस हवालदार मोहन शेळके यांच्या तक्रारी वरुन आरोपी गौरव ऊर्फ तेनाली संतोष मधुमटके यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक ०८/२०२२ कलम ३०७ , २९४ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे करीत आहे .