*इंदिरा नगर कन्हान येथे घरफोडी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला १७५५० रूपयांच्या मुद्देमाल चोरीचा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत २ किमी अंतरावरील इंदिरा नगर कन्हान येथे अज्ञात चोरांनी घराच्या दाराची कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करून एकुण १७,५५० रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.२९ डिंसेंबर २०२१ चे सायंकाळी ६ वाजता ते बुधवार दिनांक.५ जानेवारी २०२२ चे ८:३० वाजता दरम्यान भुषण रामभाऊ खानखुरे वय ५२ वर्ष राहणार. इंदिरा नगर कन्हान हे नागपुर ला गेले होते. त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरांनी ने घराचा दाराची कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले चांदीचे व सोन्याचे दागिने एकुण किंमत १७,५५० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला .
सदर प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी भुषण रामभाऊ खानखुरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे एपीआई सतिश मेश्राम हे करीत आहे.