*महामार्ग पोलीस व्दारे नुतन सरस्वती विद्या. व क. महाविद्यालयात रस्ता सुरक्षा नियमाचे मार्गदर्शन* *वाहतुक नियमाचे काटेकोर पणे पालन करा – पी एस आय दिपक कॉंक्रेटवार , अडाळे सर*

*महामार्ग पोलीस व्दारे नुतन सरस्वती विद्या. व क. महाविद्यालयात रस्ता सुरक्षा नियमाचे मार्गदर्शन*

*वाहतुक नियमाचे काटेकोर पणे पालन करा – पी एस आय दिपक कॉंक्रेटवार , अडाळे सर*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – महामार्ग वाहतुक पोलीस रामटेक, टेकाडी कँम्प व्दारे नुतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कांद्री (टेकाडी) येथे शिक्षक, विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वाहतुक नियमाची योग्य माहीतीचे मार्गदर्शन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.


महामार्ग वाहतुक पोलीस रामटेक, टेकाडी कँम्प बंद टोल नाका टेकाडी च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाच्या आयोजना अंतर्गत नुतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कांद्री (टेकाडी) येथे रस्ता सुरक्षा वाहतुक नियम मार्गदर्शन कार्यक्रम मा. प्राचार्य अढाळे सर यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी पी एस आय दिपक कॉंक्रेटवार सर, वाहतुक शाखेचे अधिकारी रमेश येले सर, दिनेश गायकवाड, नामदेव दोडके, शैलेश बिनझाडे आदीच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत करून रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविका श्री चवरे सरांनी केले. महामार्ग वाहतुक शाखेचे अधिकारी रमेश येले सरांनी आपल्या मार्गदर्शनात हेलमेट मुळे कसे प्राण वाचविता येते हे सांगितले.

त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक महामार्ग वाहतुक शाखेचे पी एस आय दिपक काॅक्रेटवार सर यांनी मुलांना जिवनात वाहतुकीचे नियम कसे पाळले पाहिजे व त्यामुळे कसे आपण स्वत: ला व आपल्या परिवाराला कसे वाचवु शकतो याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अढाळे सर यांनी रस्ते वाहतुकीच्या नियमावर सविस्तर मार्गदर्शन वाहतुक नियमाचे नियमित पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री एस. चिंचु लकर यांनी तर आभार श्री ‌लांडगे सर यांनी व्यकत केले. या कार्यक्रमाचा विद्यालय व कनिष्ट महाविद्याल याच्या सर्व विद्यार्थ्यानी लाभ घेतला.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …