*कन्हान – पिपरी नगरपरिषद ला विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची कृतज्ञता भेट* *नगराध्यक्षा, नगरसेवकांनी स्वागत करून विविध समस्या सोडविण्याची केली मागणी*

*कन्हान – पिपरी नगरपरिषद ला विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची कृतज्ञता भेट*

*नगराध्यक्षा, नगरसेवकांनी स्वागत करून विविध समस्या सोडविण्याची केली मागणी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर विधान परिषद निवडणुकीत निवडुन आलेले नवनियुक्त आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद ला भेट दिली असता नगराध्यक्षा सह नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत सत्कार करण्यात आले व त्यानंतर आढावा बैठकीत नगराध्यक्षा, नगरसेवकांनी शहरातील विविध जटील समस्याशी अवगत केल्याने आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विधान परिषदेत शासना पुढे समस्या मांडुन तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले.


शनिवार दिनांक.८ जानेवारी ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान कन्हान-पिपरी नगरपरिषद ला नागपुर विधान परिषद नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आगमन होाच ढोल ताशाच्या गजरात व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले व त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात आढावा बैठक घेतली असता नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, नगरसेवक राजेंद्र शेंदरे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक सह नगरसेवकांनी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या, कन्हान नदीवरील पुलाची समस्या, स्थाई मुख्याधिकारी, साप्ताहिक बाजारास जागेची समस्या, बसस्टाप सहित अनेक विविध समस्याबाबत अवगत केले असता त्यांनी विधान परिषदेत शासना पुढे समस्या ठेऊन तात्काळ सोडविण्याचे पर्यंत करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, संकेत बावनकुळे, कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष डायनल शेंडे, माजी नप उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी, नगरसेवक अनिल ठाकरे, राजेंद्र शेंदरे, राजेश यादव, मनिष भिवगडे, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, पुष्पा कावडकर, सुषमा चोपकर, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, मौनिका पौणिकर, वंदना कुरडकर, माजी नगरसेवक मनोज कुरडकर, अजय लोंढे, नगरपरिषद अधिकारी संकेत तालेवार, फिरोज बिसेन, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे, भाजपा पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष लिलाधर बर्वे, भाजपा कन्हान शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक, महामंत्री सुनील लाडेकर, महामंत्री माधव वैद्य, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष अमोल साकोरे , शहर महिला अध्यक्ष तुलेषा नानवटकर, महामंत्री सुषमा मस्के सह आदि पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …