*निराधार लाभार्थ्यांना निधीचे वाटप करा* *युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन*

*निराधार लाभार्थ्यांना निधीचे वाटप करा*

*युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान:- संजय गांधी निराधार योजनेसह निराधारांचे विविध शासकीय निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करा, अशा आशयाची मागणी युवा सेनेचेच्या वतीने रामटेक विधानसभेचे सचिव लोकेश बावनकर यांच्या नेतृत्वात पारशिवनी तहसीलदार प्रवीण सांगोडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
संजय गांधी निराधार योजना, अपंग व अनाथ यासह विविध शासकीय योजनेंतर्गत मिळणारा निधी मागील काही महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाने पुन्हा तोड वर काढल्याने निराधारांना या काळात आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वेळेत निधी मिळणे आवश्यक आहे. असे ही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी विमला आर. यांनाही पाठविण्यात आल्याचे युवासेनेचे रामटेक विधानसभा सचिव लोकेश बावनकर यांनी सांगितले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …