*कन्हान व साटक ला २० कोरोना रूग्ण आढळले*
*तिसऱ्या लाटेची चाहुल ४९ कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण ६४ रूग्ण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या १४७ तपासणी १९ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ८३ तपासणीत १ असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्ण आढळुन आता पर्यंत ६४ रूग्ण संख्या झाल्याने नागरिकांनी कोरोनास हलक्यात न घेता शासनाच्या प्रतिबंधात्मक नियमाचे काटेकोरपणे पालन करित वारंवार हाथ स्वच्छ धुणे, एक दुसऱ्यात अंतर ठेवणे, मॉस्क चा वापर करणे असे आवाहन कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे हयानी केले आहे.
कोरोना तिसऱ्या लाटे ची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मंगळवार (दि.११) जानेवारी २०२२ ला साईबाबा आश्रम शाळा टेकाडी येथील ९४ शिक्षक व विद्य्यार्थ्यांची व इतर ४३ अश्या १३७ तपासणी करण्यात आली. बुधवार (दि.१२) जानेवारी ला आलेल्या तपासणी अहवालात १९ रूग्ण आढळले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ८३ तपासणीत साटक चा १ रूग्ण आढळुन कन्हान व साटक परिसरातील एकुण २० रूग्ण पॉझीटिव्ह आले आहे. यात टेकाडी (को.ख) – ७ रूग्ण, इतर १२ व प्राथमिक आरोग्य केंद्र
साटक च्या तपासणीत साटक चा १ कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळुन कन्हान व साटक मधुन २० रूग्ण आढळले आहे.
(दि.१) डिसेंबर २०२१ ला टेकाडी (को.ख) नविन वसाहत येथील कलकत्ता वरून आलेल्या तरूणाची प्रकृती बिघडल्याने नागपुर ला खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने खाजगी तपासणीत तिसऱ्या लाटेचा पहिला रूग्ण आढळुन आला. मंगळवार (दि.११) जानेवारी २०२२ पर्यंत ४४ रूग्णा ना कोरोना लागण झाली. बुधवार (दि.१२) जानेवारी ला कन्हान केंद्रातुन टेकाडी चे १९ व साटक- १ असे २० रुग्ण. असे आता पर्यंत खाजगी तपासणीत २, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या तपासणीत ५७, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चे ६ , कामठी – १ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण ६४ रूग्ण संख्या झाली असुन सध्या ४९ रूग्ण होम कोरंटाईन करण्यात आले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज