Breaking News

*कन्हान शहरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद यांचा जन्मोत्सव थाटात साजरा* *विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान शहरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद यांचा जन्मोत्सव थाटात साजरा*

*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात विविध संस्था , सामाजिक संघटना द्वारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची सयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून कोविड-१९ प्रतिबंधक नियमाचे पालन करित जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

कन्हान – पिपरी नगरपरिषद

राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या सयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद कार्यालय प्रांगणात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित न प नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व नगरसेवक, नगसेविकांनी, अधिकारी व कर्मचार्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कन्हान-पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, माजी नप उपाध्यक्ष व नगरसेवक योगेन्द्र रंगारी, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, मनिष भिवगडे, नगरसेविका संगीता खोब्रागडे, कल्पना नितनवरे, अनिता पाटील, रेखा टोहने, नप कर्मचारी लकेश माहतो, भीमराव मेश्राम, रवींद्र पाहुणे, शुभम काळबांडे, शुभम येलमुले, देवीलाल ठाकुर, होमेंद्र बावनथडे सह नप अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिजाऊ ब्रिगेड कन्हान व सार्वजनिक वाचनालय कन्हान

जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जन्मोत्सवा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, प्रमुख अतिथी वासुदेव चिकटे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून ” तु म्हच आम्हच नात काय ? जय जिजाऊ जय शिवराय ” च्या जयघोषाने परिसर शिवमय करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सर्व प्रथम दिवंगत अनाथा च्या माई सिंधुताई सपकाळ ह्याना दोन मिनिटे मौनधारण करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली . त्यानंतर जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले हयानी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या मौलिक कार्य आणि संयुक्त जन्मोत्सवाचे महत्व प्रास्ताविकातुन स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांनी या दोन्ही महान व्यकती जिवनचरित्राचे चिंतन करून समाजोपयोगी कार्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षा करूणाताई आष्टणकर हयानी कोविड -१९ शासनाच्या प्रतिबंधक नियमाचे पालन करून स्वत:ची, कुंटुबाची व समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित महिला, पुरूष नागरिकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करून जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवमती सुषमा बांते हयानी तर आभार शिवमती विद्या रहाटे यानी व्यकत केले.
या प्रसंगी मनोहर कोल्हे, दिनकरराव मस्के, पवन पटले , रंजीत पाजुर्णे, शैलेंद्र दिवे, जिजाऊ ब्रिगेड च्या लता ताई जळते, रंजनाताई इंगोले, कमलताई गोतमारे, अल्का कोल्हे, सुनंदाताई दिवटे, मायाताई निंबाळकर, मनिषा धुडस, पुष्पा चिखले, शितल बांते,अनिता पाजुर्णे, सिंधु गिरडकर, कृष्णाली कोल्हे सह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

मराठा सेवा संघ शाखा कन्हान

मराठा सेवा संघ शाखा कार्यालय तारसा रोड शिवनगर कन्हान येथे कोविड-१९ चे प्रतिबंधक नियमाचे पालन करून राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन करित कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ च्या जिवन शैली व मौलिक कार्यावर उपस्थिताना मान्यवरांनी मार्गदर्शन करून आपआपल्या घरोघरी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन करून मराठा सेवा संघ दिनदर्शिका २०२२ चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ पजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष मा. शांताराम जळते, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष मोतीराम रहाटे, आर रहमान, राजुजी रेंघे, कमलसिंह यादव, राजेंद्र मसार, संभाजी ब्रिगेड कन्हाचे पवन माने, राकेश घोडमारे, अमोल डांगे, सुमित खैरकार, ऋृतिक रेंघे आदी प्रामुख्याने उपस्थित राहुन जिजाऊ जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान

पंडित. जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक आसटकर सर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवे कानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी खंडाईत सर, लाखपाले सर, रणदिवे सर, पांडे सर, बम्हनोटे सर, राजेंद्र मोरे, संजय वाघधरे , कोल्हे मॅडम, माहुरकर मॅडम, गजबे मॅडम, क्षिरसागर मॅडम, चित्रा वाघधरे, चित्रा गजभिये सह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …