*अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ देण्याची मागणी* *भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदारांना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*

*अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ देण्याची मागणी*

*भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदारांना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यात बुधवार ला झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिट पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाजपा पारशिवनी तालुकांच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार यांना भेटुन चर्चा करुन तसेच तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन नुकसान भरपाई तात्काळ मिळवुन देण्याची मागणी केली आहे .
निवेदनात सांगितले आहे कि चना , गहू , मिरची , तूर , कापूस , संत्रा आणि मोसंबी सारख्या पिकांची मोठ्याप्रमाणात दुर्दैवी हानी झाली असून शेतकऱ्यांचा समोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे . त्यामुळे त्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी या करिता भाजपा पारशिवनी तालुकांच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच त्यांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे अन्यथा भाजपा पारशिवनी तालुक्याचा वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .


या प्रसंगी भाजपा वरिष्ठ नेते कमलाकर मेंघर , भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजयुमो तालुका अध्यक्ष प्रतीक वैद्य , आशिष भुरसे , मनोज गिरी , सौरभ पोटभरे , कृष्णा मेंघर , डॉ.प्रमोद भड , परासराम राऊत , बंटी जयस्वाल , यादवराव भुते , धनराज भुते , शुभम मेंघर ,मकरंद मेंघर , पुनाराम लांजेवार , मोहन वांढरे , उनपाणे सह आदि भाजपा कार्यकर्ते व शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …