*कोरोनाच्या तीसर्या चरणातील वाढते रुग्ण चिंतेची बाब*
*उपाययोजनाना नागरिकांनी घेतले हलक्यात*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः दिवसेनंदिवस शहर व तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना संक्रमण स्थानिक प्रशासनाकरिता चिंतेचा विषय असुन नागरिकांचे अपेक्षित सहकार्य मीळत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
*सावनेर तालुक्यात आजची स्थिती बघितली तर 363 एकुण कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद असुन त्यात सावनेर शहर 152 व ग्रामीण 211 अशी असुन त्यातील 110 रुग्ण बरे झाले असुन 253 एँक्टिव रुग्णांच्या उपस्थिती सोबतच दररोज 50 च्या वर नविन रुग्णांच्या नोंदी वरच्यावर आकडा वाढवून प्रशासनास घाम फोडत आहे*
*तहसीलदार प्रताप वाघमारे,विस्तार अधिकारी दिपक गरुड,तालुका आरोग्य अधिकारी तसेच मुख्याधिकारी हर्षला राणे,प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्राच्या प्रपाठक डॉ.मंजुषा ढोबळे सह सर्व वरिष्ठ अधिकारी वाढत्या संसर्गामुळे चिंतत असुन शासनाच्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे,जनजागृती सोबतच दंडात्मक कारवाया,लसीकरण व एँन्टिजन,आरटीपीसीआर चाचण्यावर भर देऊण स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत*
*90 टक्के लसीकरण*
*जिल्ह्यात सावनेर तालुका व शहर लसीकरणात प्रथम लस 90 टक्के,दुसरी लस 80 टक्के 15 ते 18 वयोगटात 75 टक्के तर बुस्टर डोज प्रक्रिया ही पुर्णत्वाच्या जवळपास असल्याची माहिती तहसीलदार प्रताप वाघमारे व सावनेर प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्राच्या प्रपाठक डॉ मंजुषा ढोबळे यांनी दिली असुन सध्यास्थीतीत सुरु असलेल्या तीसर्या चरणातील परिस्थिती पहिल्या व दुसऱ्या चराणासारखी तिव्र नसली तरी परिस्थिती बदलता वेळ लागणार नाही करीता सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करुण स्वतः व स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यावर भर द्यावा अशी विनंती ही प्रसार माध्यामातून करण्यात येत आहे*
*सहा मिनिटाची वाक टेस्ट*
*गु्हविलगिकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांनी सहा मिनिटे पायी पाई चालुन स्वताचे आरोग्य तपासणी करणे ही गरजेचे असल्याची माहिती डॉ मंजुषा ढोबळे यांनी दिली असुन बधित रुग्णांने आपल्या विलगिकरण कक्षातच उजव्या हातातील मधल्या बोटाला आँक्सीमीटर लावून सहा मीनीटे चालन्याचा अभ्यास करावा व पहिल्या वाचणानुसार नंतरचे वाचन दोन कींवा त्यापेक्षा कमी असल्यास आपल्या प्रकु्तीत सुधारणा होत असल्याचे व त्यापेक्षा कमी वाचन येत असल्यास डाँक्टरांचा सल्ला आवश्यक असल्याची माहीती दिली*