*नाना पटोले यांचा विरुद्ध एफ आई आर दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी*
*भाजपा महिला पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल महाराष्ट्र काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अपमान जनक टिप्पणी केल्या नंतर भाजपा पदाधिकार्यांन मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका महिला पदाधिकार्यांनी कन्हान पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विलास काळे यांना भेटुन चर्चा करुन तसेच निवेदन देऊन एफ आई आर दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे .
महाराष्ट्र काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखणी तहसील अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिति चुनाव प्रचार दरम्यान नागरिकांशी चर्चा करतांनी नाना पटोले यांनी म्हटले कि *”मै मोदी को मार सकता हूं और गाली दे सकता हूं”* असे असंवैधानिक भाषण केल्याने भाजपा पदाधिकार्यांन मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका महिला पदाधिकार्यांनी भाजपा महिला आघाड़ी नागपुर जिल्हा उपाध्यक्ष शालीनी बर्बे , व पारशिवनी तालुका महिला आघाड़ी अध्यक्ष सरिता लसुंते यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांना भेटुन चर्चा करुन तसेच निवेदन देऊन एफ आई आर दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा महिला आघाडी महामंत्री पौर्णिमा दुबे , भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी महामंत्री सुषमा मस्के , नगरसेविका संगीता खोब्रागडे , सुषमा चोपकर , माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर , टेकाडी ग्रामपंचायत सदस्या सिंधुताई सातपैसे , प्रतीक्षा चवरे आरती वघारे , सह आदि भाजपा महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .