Breaking News

*बेल्लोरी हनुमान मंदिरात साईबाबांच्या चरण पादुकांचे भाविकांनी घेतले दर्शन*

*बेल्लोरी हनुमान मंदिरात साईबाबांच्या चरण पादुकांचे भाविकांनी घेतले दर्शन*

सावनेर – तालुक्यातील पाटनसांवगी नजिकच्या बेल्लोरी येथील पंचमुखी हनुमान मंदिरात आज सकाळी ७ च्या सुमारास साईबाबा यांच्या चरण पादुका आणण्यात आल्या.भाविकांच्या दर्शनासाठी धार्मिक प्रतिष्ठानांना भेटी देत साईबाबांच्या चरण पादुका विविध ठिकाणी नेण्यात येत आहे. वाकी येथील ताजुद्दीन बाबांच्या दरबारात दोन दिवसाच्या मुक्कामानंतर आज सकाळी बेल्लोरी येथे आणण्यात आल्या.*

*साईबाबांच्या चरण पादुकांच्या दर्शनासाठी सकाळी ६ वाजता पासूनच भाविकांची येथे ये जा सुरु होती. हनुमान मंदिर ट्रस्ट च्या वतीने पूजा महाआरती करण्यात आली.*

*साईबाबा यांनी त्यांचे त्यावेळचे भक्त स्व.नानासाहेब निमुनकर (देशपांडे) यांना आपली चरण पादुका दिली होती तेव्हा पासून आतापर्यंत निमूनकर यांच्याकडे पादुका आहे. नाना साहेबांचे वंशज शंतनू निमुनकर, धर्मा रेड्डी, संजय पुंजरवार हे चरण पादुका सोबत घेऊन आले होते, ट्रस्ट च्या वतीने त्यांचा सत्कार दिलीप कुकडे, अशोक चौधरी, मधुकर डांगे, वासुदेव पौणिकर यांच्या तर्फे करण्यात आला.


*चरण पादुका कोराडी येथील जगदंबा माता मंदिरात नेण्यात आल्या. २४ जानेवारी पर्यंत चरण पादुका नागपुरात आहे. दिपक ढोक, सुमित तिडके, पंकज बांगरे, अर्जुन खडसे, नितीन राऊत, दर्शन खुजे यांनी भाविकांना दर्शनासाठी मार्गदर्शन केले.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …