*कन्हान ला शहिदांना व महापुषांना दिली श्रद्धांजलि*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन तारसा शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या हस्ते शहिद स्मारकावर व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन प्रजासत्ताक दिनी शहिदांना व महापुषांना श्रद्धांजलि अर्पित केली .
बुधवार दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन तारसा शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे जेष्ठ मार्गदर्शक प्रभाकर रुंघे व भरत सावळे यांच्या हस्ते शहिद स्मारकावर व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात राष्ट्रध्वजला सलामी देऊन राषट्रगीत म्हणून प्रजासत्ताक दिन चिरायु होवो चा जयघोष केला. कार्यक्रमात उपस्थित सर्व शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी व नागरिकांनी शहिद स्मारकावर व महापुरुषां च्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन प्रजासत्ताक दिनी शहिदांना व महापुषांना श्रद्धांजलि अर्पित केली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , कोषाध्यक्ष महेश शेंडे , हर्ष पाटील , प्रकाश कुर्वे , हर्षल आकरे , संदीभ कभे , नंदू श्रीरामे , सुनील कुरजेकार , नंदू सरोदे , रामाशीष केवट , सह आदि मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदीभ कभे यांनी केले तर आभार रुषभ बावनकर यांनी मानले .
Maharashtra News Media सच की आवाज