Breaking News

*धर्मराज शैक्षणिक परिसरात गणराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*धर्मराज शैक्षणिक परिसरात गणराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कांद्री कन्हान येथील धर्मराज शैक्षणिक परिसरात धर्मराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ध्वजारोहण करुन ७३ वा गणराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मराज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पमिता वासनिक, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक श्री मेहर गुरुजी, उपमुख्याध्यापक श्री रमेश साखरकर, पर्यवेक्षक श्री सुरेंद्र मेश्राम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, ज्येष्ठ शिक्षक श्री सुनील लाडेकर उपस्थित होते.


यावेळी प्रथम संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. वंदे मातरम हे गीत संगीत शिक्षक श्री नरेंद्र कडवे सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुरेख पद्धतीने सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री सुरेंद्र मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री अनील सार्वे यांनी तर आभार श्री सुनील लाडेकर यांनी मानले. ध्वजारोहणा संदर्भातील संपूर्ण जबाबदारी क्रीडा शिक्षक श्री हरिष केवटे व श्री दिनेश ढगे यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …