*पीओएस मशीन, धान्य बोरी च्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी* *रास्त भाव दुकानदार संघटने चे तहसिलदारांना निवेदन*

*पीओएस मशीन, धान्य बोरी च्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी*

*रास्त भाव दुकानदार संघटने चे तहसिलदारांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार बांधवाच्या अडचणी मागील काही दिवसा पासुन वाढल्या असुन सुद्धा संबधित अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत असल्याने रास्त भाव दुकानदार संघटने च्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन पीओएस मशीन, धान्य बोरीच्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे .


शासनाने सरकारी स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अवलंबली असुन सुद्धा तालुक्यात गेल्या काही दिवसा पासुन एनआयसीचे सर्वर डाऊन असल्यामुळे नागरिकांचे व राशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना पाच पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे कार्ड धारक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांचे भांडणात वाढ झाली असुन पीएसओ बदल टाकले तर समाधानकारक उत्तर नाही.

गोडावुन मधुन आलेले धान्य बोरी सहित वजना मध्ये भरपुर तफावत असल्याने धान्याचे वजन बरोबर मात्रा मध्ये देण्याचा मागणी करिता रास्त भाव दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मा. प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करून तात्काळ पीओएस मशीन, धान्य बोरी च्या वजनात तफावत कमी करण्यात यावे. तसेच कमीशन मिळण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी रास्त भाव दुकानदार संघटने चे अध्यक्ष रुपंश बोंदरे, उपाध्यक्ष सुनिता मानकर, सचिव गजेंन्द्र सावरकर, घनश्याम कारेमोरे, पुरुषोत्तम पांडे, नितिन हेटे, सिद्धार्थ मेश्राम, वैभव काळे, गंगाबाई गजभिये सह आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …