*एरटेल कंपनीचे टावर लोकवस्तीतुन काढण्याचा मागणी करिता प्रहार व नागरिकांचे नप ला घेराव* *सात दिवसात कारवाई करा अन्यथा नप समोर बेमुदत ठिया आंदोलन करु – रमेश कारेमोरे*

*एरटेल कंपनीचे टावर लोकवस्तीतुन काढण्याचा मागणी करिता प्रहार व नागरिकांचे नप ला घेराव*

*सात दिवसात कारवाई करा अन्यथा नप समोर बेमुदत ठिया आंदोलन करु – रमेश कारेमोरे*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अतंर्गत प्रभाग क्रमांक. ७ येथील जुबेर शहिद खान च्या इमारतीवर एरटेल मोबाइल कंपनीचे टावर लावण्यात आल्याने या टावर च्या रेडिएशन मुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदे ला निवेदन देऊन तात्काळ दाट लोकवस्ती मध्ये लावलेला एरटेल कंपनीचा टावर काढण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्याने प्रहार जनशक्ती संघटन पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी प्रहार जनशक्ती संघटन जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदे चा घेराव करून स्थापत्य अभियंता नामदेव माने यांना निवेदन देऊन तात्काळ एरटेल मोबाइल कंपनीचे टावर दाट लोकवस्तीतुन काढण्याची मागणी केली आहे.
कन्हान शहरातील प्रभाग क्रमांक. ७ येथील रहिवासी जुबेर शहिद खान उर्फ सोनु खान यांच्या इमारतीवर नगरपरिषदेची कोणतीही परवानगी, ना हरकत न घेता बेकायदेशीर पणे एरटेल मोबाइल कंपनीचा टावर लावण्यात आला असुन ती इमारत सुद्धा नियमाबाह्य बिना परवानगी बांधकाम केलेली आहे. तांत्रिक दुष्टया कोणतेही स्टॅ्क्चर क्षमता न पाहता कुठलेही परवानगी न घेता आधी इमारत बांधकाम व आता त्यावर नियम बाह्य पद्धतीने अवैध टावरचे बांधकाम करून सर्व शासकीय नियम, अटी, शर्ती धाब्यावर टागुन राजकीय दबावाखाली नियम बाह्य कृत्य केले जात आहे. हा एरटेल मोबाइल कंपनीचा टावर दाट लोकवस्तीतुन काढण्यास स्थानिक नागरिकांनी दिनांक .२७ जानेवारी ला नप कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे यांना भेटुन निवेदन दिल्याने नगरपरिषद प्रशासनाने सोमवार दिनांक.३१ जानेवारी २०२२ ला पत्र दिले असुन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने प्रहार जनशक्ती संघटन च्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी प्रहार जनशक्ती संघटन जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदे चा घेराव करून स्थापत्य अभियंता नामदेव माने यांना निवेदन देऊन तात्काळ एरटेल मोबाइल कंपनीचे टावर दाट लोकवस्तीतुन काढण्याची मागणी केली. जर सात दिवसाचा आत कारवाई न केल्यास नगरपरिषद कार्यालय समोर बेमुदत ठिया आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
या प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगरसेविका रेखा टोहने, नगरसेवक विनय यादव, माजी नगरसेवक अजय लोंढे, राणी डांगे, राखी झाडे, भाग्यश्री उन्हाळे, आशा धुरिया, निर्म ला माकडेय, दुर्गा कामडे, कोषाल मेश्राम, शकुंतला कामडे, अशा नितनवरे, शकुंतला खांगरे, अशोक माक डे, सुधीर डांगे, सचिन यादव, पवन धुरीया, विलास शेंडे, शुभम बावणे, सोयल खान, सतीश उन्हाळे, शाली कराव बावने, प्रशिक फुलझले, अनिल उमरकर, रघुना थ लोंखडे, अविनाश निबुरकर, भास्कर ठाकुर, अश्वीनी उमरकर, शांताबाई झाडे, सुषमा श्रीवास्तव, सुनिता उपासे, कौशलबाई मेश्राम, वर्षा बावने, राधा मेश्राम, किरण माहुलकर, मालती कुथे, गिता कुर्वे, दुर्गा कांमडे सह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …