*आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे तालुका अधिवेशन संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद नवीन इमारत येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे पारशिवनी तालुका अधिवेशनात पारशिवनी तालुका कमेठीची नियुक्ती करून अधिवेशन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्यामजी काळे तर प्रमुख ज्योती अंडरसहारे, सुनिता मानकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पारशिवनी तालुका अधिवेशनाची सुरूवात करून आशा वर्कस कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याकरिता आंदोलन तीव्र करण्याचा संकल्प घेऊन तीन वर्षाकरिता पारशिवनी तालुका कमेटीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षा कौशल्या गणोरकर, कार्याध्यक्ष सुनिता हांडे , कोषाध्यक्ष निर्मला पवार , उपाध्यक्ष नलीनी शिंगणे , वैशाली बोरकरक्ष, संगीता चौधरी , सचिव सारिका धारगावे , सहसचिव शिल्पा बागडकर , रंजनी चकोले , लेंडे ताई , कमल मारबते , कार्यकारणी सदस्य- धनश्री खेडेकर , वंदना शेंडे , प्रमिला घोडेस्वार , छाया सवईतुल , बिंदु साहनी , आदींची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कौशल्या गणोरकर यांनी केले असुन सुत्रसंचालन सारिका धारगावे यांनी तर आभार निर्मला पवार यांनी मानले.
Maharashtra News Media सच की आवाज