*वराडा शेत शिवारात बिबटया च्या हल्ल्यात १ जर्शी कारवड ठार*
*सहा गावच्या शेत शिवारात बिबटयाच्या १० वेळा हल्यात १२ प्राळीव प्राणी ठार तर ५ जख्मी*
*पशुपालकांना आर्थिक साहय करून बिबटयाचा बंदोबस्त करावा.- माजी खासदार प्रकाश जाधव*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा वराडा गाव च्या शेत शिवारात बिबटयाने तिसऱ्यांदा हल्ला करून एक जर्शी कारवड ठार केली असुन आता पर्यंत ३ प्राळीव जनावरे जर्शी कारवड ठार केले. तर एक वासरू जख्मी केले आता पर्यंत परिसरातील १० घटनेत जर्शी कारवड- ६, गोरा- २, बकरी – ३, कुत्रा- १ असे १२ प्राळीव जनावरांना ठार केले तर ५ जनावरांना जख्मी केल्याने पेंच व कन्हान नदी काठावरील घाटरोहणा, जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी, टेकाडी, वराडा, एसंबा, वाघोली नांदगाव, बखारी, गोंडेगाव कोळसा खदान व जवळपास च्या परिसरात भयंकर भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने युध्दस्तरावर बिबटयास पकडुन परिसरातील ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे .
पेच व्याघ्र प्रकल्पाच्या रामटेक वनपरिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी रेंज मधिल वराडा येथील शेतकरी श्री सुधाकर खिळेकर यांचे मालकी शेत गोठयात गुरूवार दिनांक.३ फेब्रुवारी ला रात्री ६ ते ८ पाळीव जनावरे आपल्या शेत गोठयात बांधुन आपल्या घरी आले.नेहमी प्रमाणे शुक्रवार दिनांक.४ ला सकाळी शेतात गेले असता जर्शी कारवड ला बिबट्याने ठार केल्याचे दिसल्याने ग्रामस्थाच्या मदतीने वनविभाग पटगोवारी वनरक्षक श्री एस जी टेकाम ला भ्रमणध्वनीने माहिती दिली. तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटनेची माहीती आपले प्रभारी वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्र सहायक भोंगाडे साहेबांना देऊन वरिष्ठाचे आदेशाने वनकर्मी ला सोबत घेऊन पोहचुन घटना स्थळाचे निरिक्षण करून पंच १) रविशंकर ब्रम्हाणकर २) विक्रम शेळकी दोन्ही राहणार वराडा या पंचाचे साहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागाचे श्रेत्र सहायक अधिकारी भोंगाडे यांना दिला. गावकरी नागीरक व पिडित शेतकरी पशु मालक सुधाकर खिळेकर यांची दोन वर्षाच्या जर्शी कारवड ला ठार केल्याने पशु मालक सुधाकर खिळेकर यांचे २१ हजार रूपयांचे नुकसान झाल्याने गावातील नागरिक व पिडीत शेतकरी यांनी वनरक्षक श्रीकांत टेकाम याचेशी चर्चा करून मृत कारवड चे नुकसान भरपाई म्हणुन शासना कडुन २१ हजार रूपये आर्थिक सहाय्यता त्वरित मिळवुन दयावी अशी मागणी केली.

पशुपालकाना आर्थिक साहय करून बिबटयाचा बंदोबस्त करावा.- माजी खासदार प्रकाश जाधव.
पारशिवनी तालुक्यात मागील दोन महिन्यात बखारी- दोन घटनेत १ गोरा ठार १ कारवड जख्मी , गाडेघाट- १ कारवड, १ कुत्रा ठार , पिपरी- १ कारवड , एंसबा- १ कारवड, १ बकरी , घाटरोहणा – १ गोरा , २ बकरी ठार तर १ बकरी जख्मी, वराडा शेत शिवारात बिबटयाने तिनदा केलेल्या हल्यात ३ जर्शी कारवड ठार, १ वासरू जख्मी केले असे आता पर्यंत परिसरातील बिबटयाच्या १० हल्यात ६ गाव चे २ गोरे, ६ जर्शी कारवड, ३ बकरी, १ कुत्रा असे १२ प्राळीव प्राणी ठार तर ५ जख्मी केल्याने पशुपालक शेतकऱ्यांचे भंयकर नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक सहायता मदत करण्यात यावे. तसेच या बिबटया पासुन ग्रामस्थाच्या जिवितास सुध्दा धोका निर्माण निर्माण झाल्याने या बिबट्यास वनविभागाने पकडुन घनदाट वनात नेऊन सोडुन परिसरातील ग्रामस्थाना दिलासा दयावा. असे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी संबंधित अधिकार्यांशी मागणी केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज