Breaking News

*कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय येथे नायब तहसीलदारांनी आठवड्यातील दोन दिवस भेट द्यावे* *शिवसेना पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन*

*कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय येथे नायब तहसीलदारांनी आठवड्यातील दोन दिवस भेट द्यावे*

*शिवसेना पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील नागरिकांना तहसील कार्यालय येथे काम असतांना ३० किलो मीटर अंतरावर जावे लागत असुन एकाच दिवशी काम होत नसल्याने नागरिकांना अडी – अडचणीचा सामाना करावा लागत असल्याने शिवसेने च्या पदाधिकार्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन आठवड्यातील दोन दिवस नायब तहसीलदारांनी नगर परिषद कन्हान पिपरी कार्यालयाला भेट देण्याची मागणी केली आहे .
कन्हान शहरातील सोबतच आजु बाजुच्या गावातील नागरिकांना तहसील कार्यालयाशी निगडित असलेल्या कामाकरिता तहसील कार्यालय पारशिवनी येथे जावे लागत असुन कन्हान – पिपरी शहरापासुन तहसील कार्यालय पारशिवनीचे अंतर ३० किलोमीटर आहे . परंतु तहसील कार्यालयातील कामे एकाच दिवशी होत नसल्याकारणाने नागरिकांना अडी अडचणीचा सामाना करुन वारंवार तहसील कार्यालयाच्या चकऱ्या माराव्या लागतात . या विषयाला दिनांक ०८ – ०९ – २०२२ रोजी कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या सर्व साधारण सभेत ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे . त्यामुळे नगर परिषद कन्हान पिपरी कार्यालय येथे सर्व सामान्य नागरिकांचे कामे करण्यास तहसील कार्यालय पारशिवनी नायब तहसीलदार आठवड्यातील दोन दिवस गुरुवार व शुक्रवार रोजी नगर परिषद कार्यालयात राशन कार्ड , मतदार कार्ड , संजय गांधी व श्रवणबाळ निराधार व तहसील कार्यालय संबंधित सर्व कामे , करतील . नायब तहसीलदार सोबत संजय गांधी व श्रवणबाळ निराधार योजना , अन्नपुरवठा , निवडणुक व इतर सर्व विभागातील अधिकारी आठवड्यातुन दोन दिवस गुरुवार व शुक्रवार रोजी नगर परिषद कन्हान पिपरी कार्यालय राहतील . अशी मागणी शिवसेने च्या पदाधिकार्यांनी उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देऊन केली आहे .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका मौनिका पौणिकर , शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे , चिंटु वाकुडकर , अजय चव्हान , समशेर पुरवले , हरिष तिडके , सह आदि पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …