*येसंबा येथे हळदीकुंकु कार्यक्रम थाटात संपन्न*

*सरपंच धनराज हारोडे यांच्या द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – येसंबा येथे ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या द्वारे हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा हस्ते महिलांना वान वाटप करुन हळदीकुंकु कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

सोमवार दिनांक ३१ जानेवारी २०२२ ग्रामपंचायत येसंबा सरपंच धनराज हारोडे यांच्या द्वारे हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले . यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा हस्ते महिलांना वान वाटप करुन हळदीकुंकु कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत उपसरपंच रविन्द्र बांगडे , प्राथमिक शाळा येसंबा च्या शिक्षिका झाडे मॅडम , ग्रामसेवक मेघाताई मेश्राम , समाजसेविका हिराताई चकोले , ग्रामपंचायत सदस्य पंकेश्वर चकोले , वनिता राऊत , नंदा घरजाळे , भारती वाघमारे , शिल्पाताई गजभिये , माजी सरपंच वनिता चकोले , प्रतिमा हारोडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.फुलचंदजी इरपाते ,उपाध्यक्ष कार्तिकजी भोयर , मधुकरजी चकोले , अंगणवाडी सेविका सौ.मायाताई चकोले , आशावर्कर सुषमा गजभिये , अंगणवाडी मदतनिस कांताताई गजभिये , ग्रामसंघाच्या अध्यक्ष सारिका राऊत , सचिव अरूणा बांगडे , भोजराजजी घरजाळे , विठ्ठलराव महाल्ले , बबनरावजी घरजाळे , संजय गजभिये , सुधाकर महाल्ले , नरेशजी डडुरे , मनोज राऊत , युवा जोश युवा सोच ग्रुपचे सदस्य सोनु इरपाते , मोहिनी ऊके , कल्यानी इरपाते , कल्यानी भोयर प्रेषित चकोले , विशाल घरजाळे , बंटी मडावी सह आदि गावातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज