*१६ वर्षीय युवकाचे नि:शुल्क ओपन हार्ट ऑपरेशन*
*शमशेर पुरवले व चिंटु वाकुडकर यांचे प्रयत्न ठरले यशस्वी , डाॅक्टरांचा केला सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान परिसरातील विष्णु लक्ष्मी नगर येथील मांग गारोडी समाजातील गरिब १६ वर्षीय सुनिल शेंडे हा युवक हुदयविकाराच्या आजाराने त्रस्त असल्याने सामाजिक कार्यकर्ते शमशेर पुरवले व चिंटु वाकुडकर यांच्या प्रयत्नाने धर्माध संस्थे व्दारे किंग्सवे दवाखाना नागपुर येथे ओपन हार्ड ऑपरेशन करण्यात आले.

विष्णु लक्ष्मी नगर, वाघधरे वाडी कन्हान येथील मांग गारोडी समाजातील सुनिल दिलीप शेंडे हा १६ वर्षीय युवक हुदयविकाराच्या आजाराने त्रस्त होता. ही बाब सामाजिक कार्यकर्ता श्री शमशेर पुरवले व चिंटु वाकुडकर यांना माहीत झाल्याने दोघांनी प्रयत्न करू न एका धर्माध संस्थेच्या मदतीने किंग्सवे दवाखाना नागपुर येथे नि:शुल्क ओपन हार्ड ऑपरेशन केल्याने येथील डॉ प्रणित लाडे, डॉ सचिन कुथे, प्रतिक्षा जैस्वा ल यांचे मौलिक सहकार्य लाभल्याने त्यांचे श्री शमशेर पुरवले व चिंटु वाकुडकर हयानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन आभार व्यकत केले .
Maharashtra News Media सच की आवाज