*कांद्री ग्रामपंचायत कार्यालय येथे लता दिदींना वाहली श्रद्धांजली*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांद्री ग्रामपंचायत कार्यालय येथे भारतरत्न गाणकोकीळा लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच बलवंत पडोळे यांच्या हस्ते स्व.लतादीदीं च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन लतादीदीं च्या जीवना वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्व.लतादीदीं च्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन लता दीदीं ना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी सरपंच बलवंत पडोळे , सदस्य धनराज कारेमोरे , प्रकाश चाफले , महेश झोडावणे , ग्रा.पं. सदस्या दुर्गा सरोदे , सिंधू वाघमारे , वर्षा खडसे , ग्रा.वि. अधिकारी दिनकर इंगळे तसेच कर्मचारी गण मोठ्या संख्येत उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज